
कोपरगाव प्रतिनिधी:-
भाजीपाला तसेच फळ विक्रेते यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच बधितांकडून कोरोना या आजाराचा प्रसार थांबविण्याच्या उद्देशाने,

फायरब्रिगेडवर भोंगा लावून भांगरे मार्केट नवीन बाजार ओटे या ठिकाणी अनाऊंसमेंट करण्यात येत होती की तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सँनिटायझरचा वापर करणे अशा पध्दतीने जे बाजारात येत होते त्याना सुचना देण्याचे काम नगर परिषद चे काही कर्मचारी करत होते.

नगरपालिका,तहसील तसेच आरोग्य प्रशासनाने दि.१५/५/२०२१ रोजी भांगरे मार्केट,नवीन बाजार ओटे या ठिकाणी विक्रेत्यांना आवाहन करत या मोहिमेची सुरुवात केली व विक्रेत्यांनी ही शासनाला सहकार्य करत शासन कोरोना विरुद्ध लढत असलेल्या लढाईत स्वतः हिरीरीने भाग घेत,रॅपिड व आर. टी.पी. सी.आर. तपासणी करून घेतली.


या वेळी प्रशासनाने भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन ही मोहीम राबवली त्याबद्दल,
विशाल लकारे,गोविंद लकारे,अशोक कुंढारे,अशोक परे,धनंजय कहार, सचिन बिरुटे, संतोष मोहरे,हिरालाल लकारे, निसार अत्तार तसेच सर्व विक्रेत्यांनी तहसीलदार योगेशजी चंद्रे, कोपरगाव नगर परिषद चे मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.क्रुष्णा फुलसौंदर,
प्रशासन अधिकारी,आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांचा पुषपगुच्छ देऊन सत्कार केला व प्रशासनाने ही ,विक्रेत्यांनी या मोहिमेस सहकार्य केले म्हणून विक्रेत्यांचे आभार मानले.


प्रशासनाचे व नागरिकांचे एकच सम उद्दिष्ट आहे ते म्हणजे कोरोणाला हद्दपार करणे,आणि कोरोणा विरुद्धाची लढाई ही नागरिक आणि प्रशासनाने एकत्र येऊन लढली तरच आपण या आजाराला हरवू शकतो हे पण आपण लक्षात घेणं आवश्यक आहे.
