संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु.कॉलेज ब्रास बॅण्ड पथक राष्ट्रीय शालेय स्पर्धेत देशात प्रथम , जाहिर अभिनंदन:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाच्या शालेय बॅंड पथकाने 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बॅंड पथक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला संजीवनी ग्रामीण विद्यापीठ आणि शैक्षणिक समूह संस्थेच्या जागतिक ,राष्ट्रीय शैक्षणिक समूहाचे दैदिप्यमान ऐतिहासिक विक्रमी कामगिरी करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याने गांव ते राष्ट्रीय पातळीवर या शालेय बॅंड पथकावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांनी सन 1982 साली अत्यंत खडतर परिस्थितीत या परिसरातील बाल आणि युवकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित सर्व प्रकारचे शिक्षण सर्व पातळीवरील घटकांना मिळावे यासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाची मुहूर्त मेढ रौवली.
या समूहातील शिक्षण संस्थांच्या उभारणीत कोल्हे परिवाराच्या तीन पिढ्यांनी अहोरात्र आपले सर्वस्व अर्पण करुन जागतिक व राष्ट्रीय पातळीवर जगमान्यता मिळविण्यात यशस्वी ऐतिहासिक अखंड परंपरा निर्माण केली आहे. याचाच एक भाग म्हणून सैनिक स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाने सर्वं क्षेत्रात अव्वल स्थान पटकावले आहे.
संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम भारताचे प्रतिनिधित्व करताना देशात प्रथम क्रमांक मिळवला. आपली गुणवत्ता व शिस्त सिद्ध केली. नवीन दिल्ली येथील नॅशनल बाल भवन येथे झालेल्या महाअंतिम फेरीत देशातील चार विभागातील उत्कृष्ट संघाने सहभाग घेतला होता.
या अटीतटीच्या स्पर्धेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन तालबद्ध वाजन अचूकता आत्मविश्वास पूर्ण प्रेक्षकाची मने जिंकली संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय शेठ यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात बक्षीस वितरण झाले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त व सैनिकी स्कूलचे श्री.सुमित कोल्हे संगीत शिक्षक महेश गुरव ब्रास बँड पथकाचा कॅडेट विपुल वाघ व श्री.शुभम जाधव यांच्या सर्व टीमने हे पारितोषिक स्वीकारले. या ऐतिहासिक विजया मागे संस्थेचे अध्यक्ष श्री.नितीन दादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी श्री.अमित कोल्हे विश्वस्त श्री.सुमित कोल्हे यांची दूरदृष्टी पूर्ण मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळ स्व..शंकरराव कोल्हे साहेबांचे आशीर्वाद यामुळे हे पारितोषिक मिळाले. या पारितोषिक मागे सातत्य संघभावना आणि देशभक्ती यांची फळ श्रुती असून स्वर्गीय शंकरावजी कोल्हे यांनी पाहिलेले ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करणाऱ्या गुणवत्ता पूर्ण शिस्तबद्ध पिढीचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले.
या भरीव यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपिन दादा कोल्हे भाजपा प्रदेश सचिव व पहिल्या महिला आमदार.स्नेहलता ताई कोल्हे सहकार महर्षी संजीवनी कारखान्याचे चेअरमन श्री.विवेक कोल्हे यांनी याबद्दल खास अभिनंदन व आनंद व्यक्त केला.
या यशाबद्दल कोल्हे परिवार, सैनिकी स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाच्या सर्व पदाधिकारी ,शिक्षण समूहाचे सर्व शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी काळात सर्वं संस्था सह सर्वांच्या शुभ हस्ते सर्वोत्तम अविस्मरणीय प्रगती बळावर उत्तमोत्तम कामगिरी घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना —
जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
मो.9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *