
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या असुन डाऊच ब्रु ग्रामपंचायतीवर उ.बा.ठाकरेंच्या शिवसेनेने भगवा फडकविला आहे.मा.सरपंच संजय गुरसळ यांनी मागील पाच वर्षाच्या काळात जनतेचे विविध कामे मार्गी लावली.जनतेचा विश्वास त्यांनी जिंकला या कामाची पावती म्हणुन डाऊचच्या जनतेने त्यांना पुन्हा संधी देवुन त्यांची पत्नी सौ.स्नेहा संजय गुरसळ यांना प्रंचड मतांनी विजयी केले,कोपरगाव तालुक्यात काळे कोल्हे परजणे यांची मोठी ताकद आहे.प्रस्थापित पक्षाच्या विरोधात लढून त्यांनी मोठा विजय मिळविला आहे.या निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल शिवसेनेचे शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे)राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी उमेदवारांचे डाऊच येथे २४ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला आहे.याप्रसंगी मा.नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कलविंदरसिंग दडियाल,इरफान शेख ,बाळासाहेब सांळुखे,राहुल देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
