कुलगुरू डॉ. शरद गडाख यांची छत्रपति शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, काष्टी मालेगाव येथे भेट ; शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी योगा गरजेचा:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
योग ही संपूर्ण जगाला भारताने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. प्रत्येकाने आपले जीवन सुदृढ आणि समृद्ध बनवायचे असेल तर आपल्या जीवनात योगाचा अंतर्भाव असायला हवा. दररोज योग केल्यामुळे शरीर व मनाचे स्वास्थ्य चांगले राहून जीवन आनंदी होते. यासाठी योग गरजेचा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
छत्रपति शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, काष्टी, मालेगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत याप्रसंगी प्रक्षेत्र भेट, वृक्षरोपण, विद्यार्थ्यांबरोबर संवाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, प्राध्यापक डॉ. एस. पी. सोनावणे, कृषि अन्नतंत्रद्यान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विवेक कानवडे, कुलमंत्री डॉ. संजय पाटील, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. दिनेश बिरारी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. राहुल खुळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रशांत सोनावणे, सहाय्यक कुलसचिव श्री.नारायण पाठक उपस्थित होते.
यावेळी सकाळच्या सत्रात योगाभ्यास ठेवण्यात आला. यानंतर त्यांनी संकुलाच्या विविध शैक्षणिक, प्रशासकीय व प्रयोगात्मक प्रक्षेत्रांना भेटी देऊन आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांशी व प्राध्यापकांशी थेट संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नव्याने बांधलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे उद्घाटन केले.
यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते संकुलात डिजिटल प्रदर्शन प्रणालीचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण करण्यात आले. संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे यांनी संकुलाबद्दलचा प्रगती अहवाल आणि भविष्यकाळात संकुलासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन कुलमंत्री डॉ. संजय पाटील यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ. दिनेश बिरारी यांनी मानले. यावेळी कृषी विज्ञान संकुल अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी तंत्र निकेतन मधील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *