मानव विकास परिषदेकडून मा.महेश श्रीचंद होडे यांची कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी निवड..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- मानव विकास परिषद म्हणजे शोषित , श्रमिक , पोलिस कोठडीत मृत्यु , बेकायदेशीर अटक , शोषण , गुलामगिरी , दहशत , मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक , मानवी हक्कांचे उलंघन , शासकीय अधिकाराचा गैरवापर , भांडवल शाहीकडुन पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांचे संविधानिक मानवी हक्कांसाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत . सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज . सामाजिक बांधिलकी , निस्वार्थ वृत आणि प्रामाणिकपणा यामुळे मानव विकास परिषदला जनतेकडुन प्रचंड समर्थन मिळत आहे या महान कार्यात आपणास सहभागी करण्यास आमहास अत्यानंद होत असून आपली कोपरगांव तालुका अध्यक्ष पदावर दि . १८/०८/२०२१ ते दि . १८/०८/२०२२ या कालावधी करीता नियुक्ती करण्यात येत आहे . आपण आपल्या कार्यक्षेत्रत तन , मन , धनाने मानव विकास परिषदचा प्रचार , प्रसार कराल ही अपेक्षा बाळगतो . पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा , आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निवड करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *