
कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथील सुमैया सय्यद या मुलीने पाक कलेत विशेष भरारी घेतली असून खवय्यांमध्ये तो सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.
भारतीय संस्कृती नुसार ऋतूमानपरत्वे व सणवार नुसार प्रत्येक कुटुंबामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. सध्या लॉकडाउन असल्याने सर्वजण घरात बसून विविध खाद्यपदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू असल्याने मला सहजच शिरखुरमाची आठवण झाली. म्हणून तो पदार्थ कसा तयार करतात यासाठी कुतूहल म्हणून यु ट्यूब चॅनल वर https://youtu.be/Hne9pDOyUXI सर्च करून पाहिले. तर त्या ठिकाणी “घर का खाना सुमैया सय्यद” Ghar Ka Khana Sumaiya Sayyad यांची रेसेपी मला फार आवडली. त्या ठिकाणी शिरखुरमा हा पदार्थ तयार करण्याची सर्व पद्धत मी समजून घेतल्यावर त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून तेथे कमेंट बॉक्स मध्ये कौतुकास्पद दोन शब्द लिहिताना शरीफभाई हे नाव मला दिसले.
शरीफभाई यांचे नाव पाहून माझे कुतूहल वाढले आणि चित्रकारिता क्षेत्रात मुंबई मध्ये जाऊन स्वतःचा दबदबा निर्माण केलेला माझा मित्र व राहुरी फॅक्टरी येथील प्रथितयश व्यावसायिक शरीफभाई फिटर यांचे चिरंजीव आसिफ यांना मी फोन केला असता मला आश्चर्याचा धक्काच बसला.
पाक कलेत प्राविण्य प्राप्त करून स्वतःचा यु ट्यूब चॅनल सुरू करणाऱ्या व त्या माध्यमातून हजारो खवय्ये लोकांना ऑनलाइन मार्गदर्शन करणारी.., जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण असलेली सुमय्या सय्यद ही दुसरी तिसरी कोणी नसून शरीफभाई फिटर यांची कन्या व माझा मित्र आसिफ यांची बहीण असल्याचे ऐकून मला आश्चर्य वाटले.
राहुरी फॅक्टरी येथील शरीफभाई फिटर यांच्या ज्येष्ठ कण्या “अन्न हे पूर्ण ब्रह्म ” मानणाऱ्या सुमैया सय्यद हिला स्वंयपकाची प्रचंड आवड.. सतत काही ना काही रोजच्या जेवणातल्या खाद्यपदार्थ वेगवेगळ्या पद्धतींनी कसे बनवता येतील व ते खाद्यपदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट व रुचकर कसे बनू शकतील याचा ध्यास घेऊन सतत प्रयत्नरत राहिलेल्या सुमय्याने पाक कलेत निपुनता प्राप्त करून आज हॉटेल मॅनेजमेंट सारखी पदवी प्राप्त करून घरी बसलेल्या बहुसंख्य बेरोजगार मुलांना दिशा देण्याचे काम तिने केले आहे. तिच्या या कार्यामुळे कोरोना महामारीत घरात बसून हजारो खवय्ये आणि पाक कलेची आवड असलेल्या महिला लाभ घेत आहेत. अश्या या हरहुन्नरी भगिनी सुमय्याला शुभेच्छासह आपल्याला विनंती आहे की, लॉक डाउन ला विसरण्यासाठी वरील लिंकमध्ये “घर का खाना सुमैया सय्यद” ह्या यूट्यूब चॅनलला लाईक व सबक्राईब नक्की करा व घर बसल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.
आप्पासाहेब भिमराज ढुस
देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर. मो. ९८२३०३५९३६
