
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज मी कोपरगाव कोरोना वॉर रूम येथे भेट देऊन कोरोनाच्या लढाईत आरोग्यसेवा करणाऱ्या तरुण सहकाऱ्यां समवेत संवाद साधला..!!

“विविध आरोग्यासेवा संदर्भात आपल्या तरुण सहकाऱ्यांनी केलेल्या या स्तुत्य कामासाठी शुभेच्छा दिल्या.त्यांना या कार्यात रुग्णांना मदत करण्यासाठी येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्यावर विविध मार्ग या चर्चेदरम्यान सुचवले,या चांगल्या कार्यासाठी मी आपल्या सोबत आहे,इतरही तालुक्यातील तरुणांनी असा आदर्श घेऊन आपाआपल्या तालुक्यात कोरोना वॉर रूम तयार करावी व अशा माध्यमातून सार्वत्रिक प्रयत्न करुन आपण सर्वजण मिळून कोरोनावर लवकरच मात करू असा मला विश्वास आहे..!!”
वॉर रूमला संजीवनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत वेळोवेळी मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहील अशी ग्वाही दिली..!!

कोरोना लढाईत कोपरगाव मतदारसंघात सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून सर्व संस्था,राजकीय पक्ष,नेते,दानशूर,समाजसेवक यांना एकत्रित येण्याची आवश्यकता आहे,त्या दृष्टीने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही मत या चर्चेदरम्यान समोर आले..!!
या वेळी वॉर रूमचे संचालक प्रा.तुषार पोटे,गौरव सानप,शुभम गायकवाड,स्वराज सूर्यवंशी,वासुदेव शिंदे,रितेश राऊत,आकाश हलवाई,निरंजन वाघ,शुभम तांबे,सिद्धार्थ पाटणकर,प्रितम काटकर,शुभम औरंगे,दिपक कराळे,आदिनाथ कराडे आदीं.उपस्थित होते..!!
-विवेकभैय्या कोल्हे
