
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फाळणी दुःखद स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सुनील भणगे, आंतरविद्या शाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख तथा पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, डॉ. देविदास खेडकर, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, पदव्युत्तर महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे, डॉ. संगिता शिंदे, लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के व पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. गोविंद तागड उपस्थित होते. यावेळी डॉ. अधीर आहेर फाळणी दुःख स्मृती दिनाविषयी माहिती देतांना म्हणाले की दि. 14 ऑगस्ट 1947 मध्ये भारताच्या फाळणी दरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दुःख आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी फाळणी दुःखद स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा पवित्र उत्सव फाळणीच्या प्रचंड मानवी नुकसानाची आठवण करून देतो आणि शांतता, एकता आणि सलोखा या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवतो. फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे 1.45 कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली आणि नंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण दहा लाख लोकांनी प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. यावेळी विद्यापीठातील कर्मचारी, पदव्युत्तर महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
