

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापिठातील प्रकल्पग्रस्त भरतीतील गट – ड मधील माळी, सुरक्षारक्षक, मजूर व पहारेकरी या पदांची व्यावसायिक / शारीरिक चाचणी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू होणार आहे. दि. 25 ऑगस्ट, 2025 रोजी सुरक्षा रक्षक या पदाकरिता उमेदवार क्रमांक 1 ते 36 यांची व्यवसायिक/ शारीरिक चाचणी विद्यापीठ क्रीडा भवन या ठिकाणी सकाळी 8.30 वा. होणार आहे. दि. 26 ऑगस्ट, 2025 रोजी पहारेकरी या पदासाठी उमेदवार क्रमांक 1 ते 160 यांची व्यवसायिक/ शारीरिक चाचणी विद्यापीठ क्रीडा भवन या ठिकाणी सकाळी 8.30 वा. होणार आहे. दि. 28 ऑगस्ट, 2025 रोजी माळी या पदाकरिता उमेदवार क्रमांक 1 ते 9 यांची व्यवसायिक/ शारीरिक चाचणी उद्यानविद्या प्रक्षेत्र कार्यालय, उद्यानविद्या विभाग या ठिकाणी सकाळी 8.30 वा. होणार आहे. दि. 29 ऑगस्ट, 2025 रोजी मजूर या पदाकरिता उमेदवार क्रमांक 1 ते 125 यांची उद्यानविद्या प्रक्षेत्र कार्यालय, उद्यानविद्या विभाग या ठिकाणी व्यवसायिक/ शारीरिक चाचणी सकाळी 8.30 वा. होणार आहे तसेच दि. 30 ऑगस्ट, 2025 रोजी मजूर या पदाकरिता उमेदवार क्रमांक 126 ते 245 यांची व्यवसायिक/ शारीरिक चाचणी उद्यानविद्या प्रक्षेत्र कार्यालय, उद्यानविद्या विभाग या ठिकाणी सकाळी 8.30 वा. होणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांनी व्यावसायिक/शारीरिक चाचणीसाठी वेळेत हजर राहावे असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
