


कोपरगाव प्रतिनिधी
(नागपूर):- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे आज देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले व हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.


वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोपरगाव परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून त्यांचा प्रवास अधिक आरामदायक व वेगवान होणार आहे.
यावेळी खासदार मा.श्री. भाऊसाहेबजी वाकचौरे, माजी आमदार मा.सौ. स्नेहलताताई कोल्हे, रेल्वे विभागाचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

