अँड रवींद्र बोरावके यांची ग्रिड इंडिया च्या संचालक पदी नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील अँड रवींद्र बोरवके यांचे सामाजिक कामकाज मोठे आहे. शहरातील ज्योती पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्हाभर त्यांनी मोठे जाळे निर्माण केले असुन अनेक वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर आहेत बी एस एन एलचे संचालक ते आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना भारत सरकारच्या ग्रीड इंडिया च्या माध्यमातून देश पातळीवर काम करण्याची पुन्हा एकदा संधी त्यांना मिळाली आहे .भारत सरकार राष्ट्रपती द्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आली . देश पातळी वर असलेल्या ग्रीड इंडिया देशाच्या सर्व राज्यांना वीजपुरवठा नियंत्रण करणाऱ्या ग्रीड इंडियाच्या संचालक पदी रवींद्र बोरावके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडी बद्दल अॕड रविंद्र बोरावके यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *