वारीत 486 जणांची मोफत नेत्र तपासणीविद्यार्थ्यांचा समावेश , टेके पाटील ट्रस्टचा पुढाकार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या जन्मदिनानिमित्त राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व तिरळेपणाची शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये स्थानिकांसह वारीतील श्री रामेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अशा एकूण 486 जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.


या कार्यक्रमासाठी कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, बांधकाम व्यावसायिक पी. डी. आहेर, अहिल्यानगर बार असोसिएशनचे सचिव अँड. अमोल धोंडे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, वारीचे उपसरपंच विजय गायकवाड, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, डॉ. सर्जेराव टेके, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अँड. शरद जोशी, ग्रामपंचायत सदस्य विशाल गोर्डे, अनिल गोरे, दौलत वायकर, योगेश झालटे, विशाल सांगळे, मुख्याध्यापक सुधाकर साळुंखे, मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, वारीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलाक्षी फुसे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र ललवाणी, तानाजी थोरमीसे, विजयसिंह गायकवाड, गजानन टेके, नानासाहेब टेके, गौतम डोशी, अशोक मलिक, राजेंद्र मुरार, तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. हर्षल पाठक, सोशल वर्कर कैलास भड यांच्यासह ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक, राहुल (दादा) मित्र मंडळाचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या शिबिराची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी केले. याप्रसंगी हिरालाल महानुभव, आदिनाथ ढाकणे, मच्छिंद्र टेके, मधुकर टेके, प्रकाश गोर्डे विजय गायकवाड विशाल गोर्डे, दौलत वायकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिवंगत राहुल टेके यांच्या कार्याच्या आठवणींचा मागोवा घेतला. तसेच गेली चार वर्ष ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
दरम्यान या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या 486 जणांमध्ये स्थानिक 19 जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच 30 विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिरळेपणा असलेल्या तीन विद्यार्थ्यांची मोफत तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले. तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके व डॉ. सर्जेराव टेके यांनी आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी ट्रस्ट स्वयंसेवक, राहुल दादा मित्र मंडळाचे सर्व सदस्य मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट:-
दिवंगत राहुल दादा टेके यांच्या जन्मदिनानिमित्त वारीतील ऊसतोडणी कामगारांचे चिमुकले, अंगणवाडी, रामेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारी, साकरवाडी, शिरसाठवस्ती या चार शाळेतील 900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू पॅकेट वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *