के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्राप्ती दीपक बुधवंत व कु. ईश्वरी अनंत आव्हाड यांनी राजूर येथे संपन्न झालेल्या कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी स्मृती चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत क्रमशः द्वितीय व उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. दि.२३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगांव चा ही समावेश होता. ‘शेतकऱ्यांची दशा आणी दिशा’ सारख्या अत्यंत ज्वलंत विषयवार महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती बुधवंत हिने आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून द्वितिय क्रमांक पटकावला. पुरस्काराचे रोख रक्कम २५०० /- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक तिला प्राप्त झाले. तर कु. ईश्वरी अनंत आव्हाड हिस उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को.ता.एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड.संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *