
कोपरगाव प्रतिनिधी :- श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने सोमेश्वर महादेव मंदिर येथे प्रगतशिल शेतकरी व उद्योजक श्री. मंदारजी शंकररावजी आढाव व सौ. जान्हवीताई मंदारजी आढाव, गोसेवक व श्रीनिवास ट्रेडर्सचे संचालक श्री.धनंजयजी आत्मारामदादा जोशी व सौ.दिपाश्रीताई धनंजयजी जोशी, सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापक व छायाचित्रकार श्री.जयंतजी नामदेवराव विसपुते,सौ.संध्याताई जयंतजी विसपुते या उभयतांचे शुभहस्ते सोमेश्वर महादेव अभिषेक,पुजा व आरती करण्यात आली.पारंपारिक सनई चौघडे निनादात सूर्योदयप्रसंगी सण-उत्सव-परंपरेची मानाची गुढी उभारून शुभारंभ करण्यात आला आहे.


श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान हे कोपरगावची सण-उत्सव-परंपरा जोपासणारे मानाचे राजसंस्थान म्हणून ओळखले जाते.१६ व्या शतकापासून या राजसंस्थानचा पराक्रम आणि शिस्तप्रिय कारभाराचा रयतेत लौकिक राहिला आहे.महादेव मंदिर येथे महंत प.पु.अरविंदजी अरविंदजी महाराज व महंत राघवेश्वरानंदगीरी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी व जिर्णोद्धार कार्य हाती घेतले आहे.गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभारंभानिमित्त भारत वर्षातील महत्वाचे परंपरागत सण महादेव देवस्थानचे वतीने वर्षभर साजरे केले जाणार आहे.सोबत समाजप्रबोधन आणि विधायक उपक्रमही साजरे केले जाणार आहे.यात गुढीपाडवा… (चैत्र २ एप्रिल २०२२),महाराष्ट्र दिन… (वैशाख १ मे २०२३),गंगा दशहरा…जेष्ठ ( एक दिवस),गुरु पौर्णिमा…(आषाढ १३ जुलै),स्वातंत्र्य दिन…(श्रावण १५ ऑगस्ट),श्रावण मास…(श्रावण ऑगस्ट),बैल पोळा…(श्रावण २६ ऑगस्ट),गणेशोत्सव…(भाद्रपद सप्टेंबर),दसरा..(आश्विन ५ ऑक्टोबर),हरिहर भेट…(कार्तिक २९ ऑक्टोबर),कार्तिक पौर्णिमा…(कार्तिक ८ नोव्हेंबर),देव-दीपावली…(मार्गशीर्ष २४ नोव्हेंबर),मकरसंक्रांती…(पौष १४ जानेवारी) वीर योद्धा श्रीमंत सरदार यशवंतराव पवार शौर्य दिवस…(पौष १४ जानेवारी),श्री गणेश जयंती…(माघ २५ जानेवारी)प्रजासत्ताक दिन…(पौष २६ जानेवारी),महाशिवरात्र…(माघ १८ फेब्रुवारी),होळी उत्सव…(फाल्गुन ६ मार्च),रंगपंचमी…(फाल्गुन १२ मार्च) दर महा शिवरात्र, प्रदोष,या सह विविध सण आणि विधायक उपक्रम गोदावरी नदी काठालगत कोपरगावातील गावठाण, सराफ बाजार सोमेश्वर महादेव मंदिर,कोपरगाव बेट येथील महादेव मंदिर,जेऊर कुंभारी,गोदावरी नदीलगत गंगेश्वर महादेव मंदिर येथे साजरे केले जाणार आहे.कोपरगाव शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर येथे प्रगतशिल शेतकरी व उद्योजक श्री. मंदारजी शंकररावजी आढाव व सौ. जान्हवीताई मंदारजी आढाव, गोसेवक व श्रीनिवास ट्रेडर्सचे संचालक श्री.धनंजयजी आत्मारामदादा जोशी व सौ.दिपाश्रीताई धनंजयजी जोशी, सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापक व छायाचित्रकार श्री.जयंतजी नामदेवराव विसपुते,सौ.संध्याताई जयंतजी विसपुते या उभयतांचे शुभहस्ते सोमेश्वर महादेव अभिषेक,पुजा व आरती करण्यात आली.त्यानंतर सूर्योदयप्रसंगी सण-उत्सव-परंपरेची मानाची गुढी उभारून शुभारंभ करण्यात आला आहे.महादेव मंदिर, बेट येथे श्री.मच्छिंद्रजी सोनवणे,गंगेश्वर महादेव मंदिर, जेऊर कुंभारी येथे श्री.पाटीलबा वक्ते यांचे शुभहस्ते गुढी उभारून विधिवत पुजा करण्यात आली आहे.या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने यजमानांचा मानाची टोपी,उपरणे, श्रीफळ आणि प्रसाद देवून सन्मान करण्यात आला आहे.या प्रसंगी श्रीमंत महामहीम पवार सरकार महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र(बाळासाहेब)पाटील,सौ.संगिता पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापन समितीचे मनोज कपोते,सौ.कावेरी कपोते,महावीर शिंगी,रणजित पाटील,सौ.सायली रणजित पाटील पौरोहित्य प्रविणशास्री मुळे गुरु,प्रशांतस्वामी जंगम,मनोज विसपुते,नंदू शेंडे,खंडू वाघमारे,रमेश गुरव यांचे सह परिसरातील सोमेश्वर महादेव भक्त उपस्थित होते…
