ज्ञानसत्र ,क्रीडास्पर्धा, मनोरंजनाने सहकारी बँक संमेलन संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अकरा व बारा जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन द्वारा आयोजित दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन संगमनेर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.
या दोन दिवसीय संमेलनामध्ये बँकिंग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता ,परफॉर्मन्स बुस्टर ,इंटरनल ऑडिट ,इन्शुरन्स इ. विषयावर ज्ञानसत्र आयोजित केले होते.
तसेच कर्मचाऱ्यांसाठी कॅरम, बॅडमिंटन ,गायन, अंताक्षरी, नोट काउंटिंग इ.स्पर्धा आयोजित केली होती .
सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला.
या संमेलनामध्ये 22 सहकारी बँकांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
संमेलनाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून राज्य फेडरेशनचे श्री अजय ब्रम्हेच्या, श्री विश्वास ठाकूर, सहकार विभागातील श्री कोरे साहेब, राजेंद्र जी वाकचौरे, असोसिएशनचे अध्यक्ष श्री सात्येन मुंदडा , उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे,संमेलन समन्वयक श्री सुधाकर जोशी व श्री प्रकाश राठी उपस्थित होते.
उद्घाटक बाळासाहेब थोरात यांनी सहकारी बँका चालविणे अतिशय कठीण आहे असे सांगितले व आरबीआयच्या निर्देशनानुसार बँका चलीवली पाहिजे असे मार्गदर्शन केले.
राज्य फेडरेशन चे अध्यक्ष ब्रम्हेचा यांनी अशा प्रकारचे संमेलन जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असल्यामुळे संमेलनाचे कौतुक केले.
अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी प्रस्तावना केली व संमेलनाचा उद्देश सांगितला.
व्याख्याते म्हणून श्री विश्वास जी ठाकूर , विजयजी बनकर अविनाश कुमार सिंग, सीए संजय राठी उपस्थित होते.
आभार प्रकाश राठी यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *