
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार होत असून, रुग्णांची लूट सुरू आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.
नगर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा आलेख बघता आरोग्य विभागामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. शासन टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंटवर भर देत असताना आपल्या जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यातील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल तब्बल पंधरा दिवस होऊन ही मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
पंधरा दिवस जर त्या रुग्णाचा अहवाल मिळत नसेल तर त्या रुग्णाला योग्य तो उपचार मिळत नाही त्याची प्रकृती चिंताजनक होती.
अशा परस्थितीत नगर जिल्ह्यात रेमदेसिविर असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. हे रेमडेसिविर इंजेक्शन 1500रु ला असताना तर हेच इंजेक्शन 20 हजार ते 22 हजार ला विकले जाते.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दिलेला नंबर ही अधिकारी उचलत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कारण्यात आला आहे.हा सर्व प्रकार तत्काळ थांबवावा.अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या मा.जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
