भारतीय स्वातंत्र्यदिनी संविधान पुजन आणि उद्देशिका स्वेच्छेने सामुदायिक वाचन करावे, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने घरोघरी तिरंगा अभिमानाने फडकवून भारताचे संविधान पुजन करुन उद्देशिका सामुदायिक वाचन स्वेच्छेने करावे.असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.
सद्यस्थितीत अनेक देशात राजकिय आणि सामाजिक अस्थिरता दिसून येते आहे. सांस्कृतिक अतिरेक हा त्या-त्या देशांच्या अधोगतीला दिवसेंदिवस कारणीभूत ठरतो आहे.या अतिरेकातून घेतले जाणारे निष्पापांचे बळी हे तेथील लोकशाही आणि माणुसकी पायदळी तुडवत आहे. या सर्व अस्थिर बाबींना त्या-त्या देशातील मुलभुत हक्क आणि कार्यपद्धती अधोगतीला कारणीभूत ठरत आहे.अशा प्रसंगी जगातील अनेकांना भारत हे सर्वार्थाने आश्रयासाठी सुरक्षित राष्ट्र वाटत आहे.हजारो वर्षापूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी विज्ञानवादी शोध लावले आहेत. तक्षशिला,नालंदा सारखी विद्यापीठ ही ज्ञानदानात भारताचे विश्वगुरू स्थान अधोरेखित करतात.विश्वातील सर्वांसाठी सुख आणि समाधानासाठी विश्व शांतीची प्रार्थना करण्याची भारताची परंपरा राहिली आहे.भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला स्वतंत्र भारतात संविधानाची मिळालेली जोड ही भारताची मान आणि शान संपूर्ण विश्वात वाढवत आहे.
भारताचे संविधान हा देशाच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष रचनेचा पाया आहे.भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ज्यामध्ये राजकीय कल्पना, कार्यपद्धती आणि सरकारी प्राधिकरणांचा पाया आहे. भारतीय राज्यघटनेचे ज्ञान सर्व भारतीय नागरिकांना असणे आवश्यक आहे. नागरिकांचे हक्क दर्शवितांना त्याचे पालन हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्याची जाणीव करुन देत आहे.
भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सुरु झालेले घरोघरी तिरंगा अभियान याही वर्षी सुरु आहे. स्वातंत्र्य दिन नागरिक राष्ट्रध्वज फडकवून मोठ्या उत्साहात साजरा करतात.देशभर सार्वजनिक कार्यक्रमात नागरिक एकत्र येऊन अनेक ठिकाणी भारतमाता पुजन,महात्मा,स्वातंत्र्य योध्दे,स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सैनिक यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीरांच्या आठवणी जागवल्या जातात.स्वातंत्र दिनाचे पूर्वसंध्येला राष्ट्रभक्ती जनजागृती फेरी,स्वातंत्र्यपूर्व काळातील अखंड भारत याच्या आठवणी जागवल्या जातात. अशा कार्यक्रम प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमतात. अशा वेळी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे आपल्या भारताचे पवित्र संविधानाचे पुजन आणि त्यातील उद्देशिका स्वेच्छेने सामुदायिक वाचन करुन सर्व भारतीयांना एकसंघ ठेवण्यासाठी सामाजिक समरसतेचा पाया भक्कम करावा.यात शैक्षणिक,सामाजिक संस्था सह विविध समुहाने संविधान पुजन आणि उद्देशिका वाचन स्वेच्छेने करावे.आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *