

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालय या शाळेला नुकताच
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगीता या स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळांमधून रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयास विशेष पारितोषिक देऊन नुकतेच गौरविण्यात आले
जळगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात थोर अणुशास्त्रज्ञ डॉ अनिलजी काकोडकर यांच्या हस्ते व जैन इरिगेशन सिस्टीम या संस्थेचे अध्यक्ष अशोकजी जैन व डॉ सुदर्शन अय्यंगार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने कैलास शेळके यांनी पुरस्कार स्वीकारला
शिक्षणाबरोबरच स्वच्छतेचे संस्कार घडावे या गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचे संस्करण विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी शाळेने या प्रतियोगितेत सहभाग घेतला होता प्रतिवर्षी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी गांधी विचारधारा संस्कार परीक्षेस बसतात विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या कार्याची इत्यंभूत माहिती पुस्तकांच्या माध्यमातून देण्यात येते व त्यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. यातून विद्यार्थ्यांमध्ये सत्य अहिंसा व समतेची शिकवण रुजवली जाते. स्वच्छ शाळा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागल्या त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी देखील गेल्या तीन वर्षांपासून दर रविवारी वारीत स्वच्छता अभियान राबविले असून या स्वच्छता चळवळीत सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी काम केले आहे ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साळुंके एस. ए यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी तसेच गांधी रिसर्च फाउंडेशन चे विद्यालयातील समन्वयक आदर्श शिक्षक श्री कैलास शेळकेसर यांनी विद्यालयात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती केली त्यासाठी मनापासून प्रयत्न केले त्यामुळेच श्री रामेश्वर विद्यालयाला हा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे
या यशामुळे विद्यालयाचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक पालक संघ शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,माता पालक संघ सर्व आजी-माजी विद्यार्थी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ आदी सर्वांनी शाळेचे अभिनंदन केले आहे
