
कोपरगाव प्रतिनिधी:-
न भूतो न भविष्य असे संपूर्ण जगात कोरोणा महामारी या आजाराने सर्व देशांना धक्का दिला आहे .या मध्ये भारत देशात महाराष्ट्र हा आघाडी वर आहे.
महाराष्ट्रात कोपरगाव हे हाॅस्पॉट म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. कोपरगाव मध्ये दिवसेनदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल ला आपण सर्वजण धुमधडाक्यात साजरी करत असतो परंतु यावर्षी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत असून. यामध्ये रुग्णांची संख्येबरोबर मृत्यूची संख्यादेखील जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लग्न विवाह, अंत्यविधी, दहाव्या चे कार्यक्रम, आठवडे बाजार ज्या ज्या ठिकाणी गर्दी होत असेल असे ठिकाण बंद केले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, आप- आपल्या भागामध्ये मास्क, सॅनिटायझर व रुग्णांना फळे किंवा औषधे देऊन १४ एप्रिल साध्या पद्धतीने साजरी करावी. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा सल्लागार शरद खरात यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
