रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान हेच रक्त तुमच्या-आमचा जिव वाचवू शकत; चला तर मग रक्तदान करुया:- डॉ. अनिरूद्ध काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील १ वर्षांपासून आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. या संकटाशी लढत असताना इतर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे आणि कोरोना संक्रमणाच्या भीतीने नियमित रक्तदाते रक्तदान करू शकत नसल्याने रक्ताचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. व त्यामुळे इतर रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागत आहे.

रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन शिक्षणमहर्षी, माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या सौजन्याने श्री साईबाबा तपोभूमी मंदिर (मंगल कार्यालय) कोपरगाव येथे काल ६ एप्रिल २०२१ पासून सकाळी ९:०० ते १२:०० दरम्यान दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच सदर ठिकाणी कोरोना संक्रमणापासून बचावासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे ही विनंती..!

इच्छूक रक्तदात्यांनी नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
श्री. योगेश निकम:- 9822491637

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *