


कोपरगाव प्रतिनिधी:-
रविवार दिनांक 02/06/2024 रोजी सकाळी 7.30 वाजता इन्फोसिस च्या सांस्थपिका , थोर समाज सेवक , पद्मश्री , पद्मभूषण , ज्येष्ठ लेखिका व इंग्लंड चे पंतप्रधान श्री ऋषी सूनक यांच्या सासूबाई सौ सुधा नारायण मुर्ती या आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदीरात महाराज्यांच्या दर्शनासाठी आल्या होत्या . येथे त्यांनी आपली मुलगी व जावई श्री ऋषी सुनक व कुटुंबीय साठी गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या कडे संकल्प करून साकडे घातले . त्या नंतर त्यांनी संपूर्ण मंदिर पहिला व मंदिराचा इतिहास जाणून घेतला . मंदिरा बाबद सर्व माहिती त्यांना देण्यात आली .



मंदिर ट्रस्ट च्या वतीने ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला . या प्रसंगी श्री बाळासाहेब आव्हाड , श्री दत्तात्रय सावंत, श्री भगचंद रुईकर , बाळासाहेब लकारे , श्री सुशांत घोडके , श्री व सौ डॉ संतोष आव्हाड , श्री व सौ प्रमोद कोऱ्हालकर , मंदिर व्यवस्थापक श्री राजाराम पावरा , पुजारी श्री जोशी व श्री भणगे उपस्थीत होते. .
मंदीर ट्रस्ट चे वतीने अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी सौ सुधा नारायण मुर्ती यांचे कडे ब्रिटन चे पंतप्रधान श्री ऋषी सुणक यांना सह कुटुंब मंदिरात येण्याचे आमंत्रण दिले .
