दृष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताचा अवतार:- परमानंद गिरी महाराज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सद्गुरूंच्या सानिध्यात जीवाचा उद्धार होतो म्हणून संत सेवा केली पाहिजे ,या अती पाप झाले तर दृष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतो.भक्त प्रल्हादला वाचविण्यासाठी नृसिंह अवतार घेतला असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे भगवान नृसिंहाचे पुरातन मंदिर असून गेल्या अनेक वर्षापासून प्रकट उत्सव साजरा केला जातो.हे अतिशय जागृत देवस्थान असून ह्या वर्षी जप, अनुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,माता भगिनींचां सन्मान केला पाहिजे.सर्व माता ,भगिनी देवीचा अवतार आहेत.त्यांच्यमध्ये प्रचंड सामर्थ्य असते.त्या खूप काही करू शकतात .भगवान शिव जे काही करतात त्यामागे जी शक्ती आहे ती अर्धांगिनी देते.
सप्ताह काळात अनेक साधू संत यांनी भेट दिली. तसेच आमदार आशुतोष काळे ,माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे , गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने,माजी सभापती मच्छिंद्र टेके, कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष मधुकर टेके,नामदेव जाधव यांचेसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेटी दिल्या .
सदर सत्संग प्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी
कान्हेगाव,वारी, भोजडे ,रामवाडी, संवत्सर,धोत्रे,तळेगाव, अंदरसुल, सडे आदीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *