
कोपरगाव प्रतिनिधी (सिन्नर):-
तालुक्यातील कोळगाव माळ येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव गंगाधर पाटील चंद्रे(वय ६५) यांचे निधन झाले आहे.
त्यांचे पच्छात बंधू,पत्नी,दोन मुले,दोन मुली,पुतणे,सुना,जावई, नातवंडे असा चंद्रे परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी व कोळगावमाळचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते किरण चंद्रे व कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे ते वडील होते.तर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई चंद्रे या कोळगाव माळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आहे. विठ्ठलराव चंद्रे यांचा स्पष्ट,सुस्वभावी आणि मनमिळावू स्वभाव राहिला.पंचक्रोषित ते “अप्पा” या नावाने ओळखले जात. विठठलराव चंद्रे यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
