पावसाळा सुरू झाला तर कामे करणे अवघड होईल. सर्व नगरसेवकांना मी पत्र पाठवून विचारणा करणार आहे कि “तुमच्या प्रभागातील कामे करायचेत कि नाही? :- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
दि.16/2/2021 च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. 11 कोल्हे गटाने नामंजूर केल्याने शहराच्या अनेक प्रभागातील महत्वाची 28 विकासकामे करता येणार नव्हती, म्हणून मी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 308 अन्वये मा.जिल्ह्याधिकारी यांचेकडे सदरची कामे मार्गी लागण्यासाठी अर्ज केला होता. दोन वेळा सुनावणी घेतल्यानंतर दि. 23/3/2021 रोजी पुढीलप्रमाणे निर्णय देण्यात आला. सदर कामांबाबतची अंतिम मंजुरी देईपर्यंतची प्रक्रिया ही कायदेशीरपणे पूर्ण झाल्याने सदरची काही कामे अंदाजपत्रकिय दराने व काही कामे अंदाजपत्रकापेक्षा कमी दराची असल्याने सदर प्रक्रिया रद्द करणे कायद्यास अभिप्रेत नाही. शासकिय संस्थामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात आली असल्याने अंदाजपत्रके जास्तीची आहेत असे म्हणणेही उचित नाही. नवीन दरसुचीनुसार अंदाजपत्रके वाढणार असून पुन्हा तांत्रिक फीही भरावी लागणार यामुळे नगरपरिषदेस आर्थिक भार पडणारच. सदरची कामे रद्द झाल्यास नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होऊन कामास विलंबही होऊ शकतो. पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया राबविणे उचित होणार नाही. म्हणून दि.16/2/2021 च्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र.11 तहकूब करण्यात येत आहे.
मात्र इतके सर्व होऊनही कोल्हे गटाने नगरसेवकांच्या सह्यानिशी अर्ज देऊन माझ्याकडे मागणी केली कि सदरची कामे करण्यात येऊ नयेत, होणाऱ्या आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार रहाणार नाही. आम्ही तुमच्या विरुद्ध फौजदारी दंड संहितेनुसार कारवाई करू. राजकिय द्वेषाने पछाडलेला कोल्हे गट मला श्रेय मिळू नये यासाठी शहर विकासकामानाही आडवा येत आहे. सर्वात वाईट म्हणजे “कोल्हे” यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून माझ्याकडे अर्ज दिलेला आहे. पूर्वीच कधीतरी घेऊन ठेवलेल्या सह्यांचा कागद या अर्जासोबत जोडलेला आहे. कारण कोल्हे गटाच्या काही नगरसेवकांनी मला भेटून सांगितले कि, “कामे करू नका” असे लिहिलेल्या कुठल्याही अर्जावर आम्ही सही केलेली नाही. आम्हाला आमच्या प्रभागातील कामे करून घ्यायची आहेत, निवडणूक जवळ आलेली आहे. जनतेचाच नव्हे तर स्वतःच्याच नगरसेवकांचाही विश्वासाघात करणाऱ्या कोल्हे गटाच्या खोटारड्या नेत्यांचा मी जाहीर निषेध करतो. पूर्वीच कधीतरी घेऊन ठेवलेल्या सह्यांचा कागद या अर्जासोबत जोडणाऱ्या कोल्हे गटाने निचपणाचा कळस गाठलेला आहे.नगरसेवक जाहीरपणे बोलत नाहीत, कारण नेत्यांचा धाक. नगरसेवकांना वेठबिगार समजू नका. सह्यांचा असाच गैरवापर करून हे नेते नगरसेवकांचे राजीनामेही मा.जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवू शकतात. यानंतर हे नेते नगरसेवकांना माझ्याविरुद्ध बोलायला, बातम्या द्यायला भाग पाडणारच. शिवाय काही पाकिटवाले दुसऱ्या बॅनरखाली मेसेज टाकायला ठेवलेले आहेतच. ते कोण कोण हे शहरवासीयांनाही माहित आहे.
ठराव क्र. 11 तहकूब करून मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानुसार सदरची कामे लवकर सुरू करायची आहेत. कारण पावसाळा सुरू झाला तर कामे करणे अवघड होईल. सर्व नगरसेवकांना मी पत्र पाठवून विचारणा करणार आहे कि “तुमच्या प्रभागातील कामे करायचेत कि नाही? कारण कार्यादेश देऊन प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर कोल्हे गटाने कामे मधेच बंद पाडली तर जास्त नुकसान होईल. म्हणून “माझ्या प्रभागातील काम करा किंवा करू नका” असे पत्र नगरसेवकांनी दिल्यावर कामे सुरू करणे योग्य होईल असे मला वाटते.
शहरातील अनेक नागरिक, राष्ट्रवादीचे नगरसेवक, अपक्ष व शिवसेनेचे दोन नगरसेवक हे सातत्याने सदरची कामे लवकर चालू करा अशी मागणी करत आहेत. त्यानुसार लवकरच कामे मार्गी लागणार आहेत. विजय वहाडणे
नगराध्‍यक्ष,
कोपरगांव नगरपरिषद, कोपरगाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *