
कोपरगाव प्रतिनिधी:- अखेर ईश्वरी सुखरुप तिच्या घरी आली
मोहनिराजनगर भागा मध्ये दिनांक ९ / ११ /२०२१ रोजी पाईलच्या खड्ड्यांमध्ये ४ वर्ष ईश्वरी गंगावणे हि चिमुरडी पडली होती साधारण दोन ते तीन तासा नंतर तिला बाहेर काढण्यात यश आले
व तिला
कोपरगाव पोलिस निरीक्षक वासुदेव जी देसले साहेब
यांनी S J S या हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
त्या वेळेस उपचारा दरम्यान तीच्या उजव्या हाताचा पंजा काढण्याची वेळ तिच्या वर आली.
परंतु दैवी शक्ती असल्या प्रमाणे ईश्वरीने न घाबरा डाॅक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत सर्व दु:खावरती मात करून आज दिनांक १३ / ११ / २०२१ रोजी घरी येत असतांना
पुन्हा एकदा
पोलिस निरीक्षक अधिकारी कसा असावा यांचे दर्शन झाले
या वेळी ईश्वरीला खड्ड्यातून बाहेर काढत होते त्यावेळी तिच्या अंगावर असलेला लाल रंगाचा फ्राॅक कापण्यात आला होता हे साहेबांच्या स्मरणात होते


त्यामुळे ईश्वरीला उपचारानंतर घरी सोडणार समजताचं वासुदेव जी देसले साहेबांनी ईश्वरीसाठी अतिशय सुंदर लाल रंगाचा फ्राॅक घेऊन येवुन स्व:ताच्या हाताने घातला व कड्यावर घेऊन हाॅस्पिटल बाहेर घेऊन आले
एवढेच नव्हे तर
मोहनिराजनगर भागात येऊन ईश्वरीच्या नव्या जन्मचा आमच्या आग्रहानिमीत्त लक्ष्मीआई मंदिरात तिचा वाढदिवस साजरा केला
ईश्वरी सुखरुप घरी आल्याचा आनंद तिच्या घरच्यांना बरोबरच संपूर्ण मोहनीराजनगर भागामधिल नागरीकांन झाल्याचा दिसुन आला
वासुदेवजी देसले साहेबांनी सुरवाती पासुन ते ईश्वरी घरी येई पर्यंत जे मोलाचे सहकार्य केले
त्या बद्दल साहेबांचे मानावे तेवढे आभार कमीचं आहे
यावेळी

मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे
तसेच समस्त नागरिकांना पुन्हा एकदा साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत
खुप खुप धन्यवाद सरजी
