संवत्सरच्या शामराव हिंगे यांनी घेतले को_८६०३२ उस जातीचे ४४ गुंठयात ८४ मे टन उत्पादन…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील संवत्सर येथील शेतकरी शामराव सखाराम हिंगे यांनी को ८६०३२ उस जातीचे ४४ गुंठे क्षेत्रात ८४ मे. टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात ७६ मे. टन विक्रमी उत्पादन घेवुन उच्चांक प्रस्थापीत केला आहे त्याबददल कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
श्री. शामराव हिंगे यांनी जाड जमिनीतही उच्चांकी उत्पादन घेतल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. शामराव हिंगे यांनी कोल्हे कारखान्यांमार्फत कोईमतुर उस संशोधन केंद्रातुन आणलेल्या पायाभूत को ८६०३२ जातीचे उस बेणे घेतले होते व कारखान्यांने कंपोष्ट पासून बनविलेल्या जीवाणू खतेयुक्त समृध्द सेंद्रीय खताचा वापर केला होता. कोल्हे कारखान्यांच्या उस विकास व शेतकी खात्याने वेळोवेळी मार्गदर्शन केल्यांने उसाचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले असे शामराव हिंगे यांनी बोलतांना सांगितले. कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी हिंगे यांचे अभिनंदन करून इतर उस उत्पादकांनीही त्यांचा आदर्श घेवुन उस उत्पादनांत वाढ करावी असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *