
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यात करोना साथीच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले रुग्णांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आर्थिक लूट होत असून ही लूट थांबविण्यासाठी रुग्ण हक्क समितीची स्थापना करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील वर्षांपासून सुरू झालेल्या करोना साथीच्या आजाराने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून मागील वर्षा पेक्षा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण निघत असून साथीच्या आजाराचे निदान झाल्यानंतर रुग्णांना योग्य व खात्रीलायक तपासणी,उपचार कुठे का घ्यायचे ?औषधांची उपलब्धता, उपलब्ध बेड ची स्थिती यांची वेळेवर माहिती मिळत नाही त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत असून रुग्णाच्या अगतिकतेचा गैर फायदा घेऊन खाजगी हॉस्पिटल कडून मोठी आर्थिक लूट होत रुग्णांना योग्य व तात्काळ आणि सोयीच्या ठिकाणी उपचार मिळावा हा प्रत्येक रुग्णाचा हक्क आहे मात्र कोपरगाव शहरात अशा प्रकारे रुग्णांच्या हक्कांबाबत कोणतीच काळजी घेतली जात नाही
या साठी तहसील साहेब यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी ,मेडिकल असोशियशनचे प्रतिनिधी, औषध विक्रेते यांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांची नियुक्ती करून रुग्ण हक्क समितीची स्थापना करावी व रुग्णांना योग्य व माफक तसेच वेळेवर वैदयकीय सुविधा उपलब्ध व्हावी या करिता योग्य निर्णय घ्यावा असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे,सुजल चंदनशिव, पप्पू वीर दीपक आरणे,व्यापारी समितीचे अकबर शेख, निसार शेख,गौतम बनसोडे,अजय विघे, सुनील फंड,शरद त्रिभुवन, हरीश मंटाला अमित आगलावे, किरण ठाकरे, अनिल पगारे , अर्जुन मोरे, मंगेश औताडे,संतोष चोपडे, आदी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे
