

कोपरगाव प्रतिनिधी:-
सलाबादप्रमाणे याही वर्षी तिथीनुसार चालत आलेली शिवजयंती कोरोनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून साध्या पद्धतीने कोपरगाव शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली . कोपरगांव शिवसेना माजी शहरप्रमुख सनी वाघ व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

शिवनेरी किल्ल्यावरून वीरमुद्रा प्रतिष्ठाण शिवसेना उपशाखा या मंडळाने शिवज्योत आणली . नवश्या गणपती मंदिराजवळ शिवज्योत आगमन झाले . तेथे शिवज्योतीचे स्वागत माजी शहरप्रमुख सनी वाघ , शिवसेना नगरसेवक योगेश बागुल , बालाजी गोर्डे , रविंद्र कथले . सनी डिंबर यांनी केले . तेथुन छत्रपती शिवाजी महाराज स्मारका पर्यंत शिवज्योत आणण्यात आली . छत्रपती शिवाजी स्मारक येथे सकाळी ७.३० वा . शिवराज्याभिषेक व महापुजा करण्यात आली . सकाळी ९ .०० वा . झोपडी केंन्टीन , इंदिरा शॉपिंग सेंटर येथे प्रतिमापुजन करण्यात आले . सकाळी १० वा . कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना ५०० मास्क वाटप करण्यात आले . कोपरगावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले . सदर कार्यक्रम प्रसंगी माजी शहरप्रमुख सनी वाघ , मा.उपनगराध्यक्ष योगेश बागुल , नगरसेवक अनिल कालु आव्हाड , युवासेना विस्तारक सुनिलभैय्या तिवारी , शिवसेना उपशहरप्रमुख , बालाजी गोडें , कुणाल लोणारी , अमोल शेलार , संतोष जाधव , उपशहर संघटक सनी काळे , सागर फडे , वसीम चोपदार , ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रवि कथले , गोदामाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अदिनाथ ढाकणे युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव , तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके , शहरप्रमुख नितीश बोरूडे , उपशहरप्रमुख मयुर फुकटे , ऋषी धुमाळ , अभिषेक सारंगधर , दिपक कराळे , गणेश पंडोरे , प्रस्ताद ताकवले , सचिन सुर्यवंशी , निलेश महाले , मयुर शिरसाठ , बाबा कुंवारे , शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष – विजय भोकरे , उपाध्यक्षा सागर पंडोरे , सनी टिंबर , शिवा चंदनशिव , यसीम पटेल कार्याध्यक्ष – सागर फडे , राहुल खडांगळे , खजिनदार – रविंद्र कशले . अल्ताफभाई शेख , उत्सव कमिटी सदस्य – बालाजी गोर्डे , सोमनाथ लोहकरे , सनी काळे , शेखर बोरावके , आशिष निकुंभ , शिवमस्तकाभिषेक प्रमुख – सिद्धार्थ शेळके , गणेश जाधव , नियोजन कमिटी – सागर परदेशी , राहुल कवरे , शिवज्योत प्रमुख – किरण गायकवाड , रवी मरसाळे विरमुद्रा प्रतिष्ठाण शिवसेना उपशाखा , सुभाषनगर आदि शिवसैनिक व शिवभक्त उपस्थित होते .
