
कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि .२७.०३.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता कोरोना महामारीच्या निर्बधामुळे व शासनाच्या कोविड -१ ९ च्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या सभागृहात उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन श्री . अतुल धनालाल काले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चेअरमन श्री . अतुल काले यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या भविष्यातील प्रगती बाबतची रूपरेषा मांडली . यावेळी व्यासपीठावर बँकेचे विद्यमान चेअरमन श्री . अतुल धनालाल काले , व्हा . चेअरमन सौ . प्रतिभा शिलेदार व संचालक मंडळ सदस्य श्री . रतनचंद ठोळे , श्री . कैलासचंद ठोळे , डॉ . श्री . विजयकुमारी कोठारी , श्री . सुनिल कंगले , श्री . रविंद्र लोहाडे , श्री . धरमकुमार बागरेचा , श्री . कल्पेश शहा , श्री . राजेंद्र शिंगी , श्री . वसंतराव आव्हाड , श्री . यशवंत आबनावे , श्री . सत्येन मुंदडा , श्री . सुनिल बंब , श्री . रविंद्र ठोळे , श्री . हेमंत बोरावके , सौ . प्रभावती पांडे , श्री . संजय भोकरे , श्री . प्रसन्ना काला , श्री . विरेश पैठणकर , श्री . अशोक पापडीवाल , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिपक एकबोटे इत्यादी उपस्थित होते . बँकेच्या सभासदांना मिटींगला ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी मोबाईलवर लिंक पाठवण्यात आली होती . या लिंकचा वापर करून अधिकाधिक सभासदांनी हजेरी लावली . सदर सभेमध्ये काही विषयावर श्री . अशोक अजमेरा , श्री . सुधीर बज व श्री . केशव भंवर या सभासदांनी ऑनलाईन सभेत सहभागी होऊन काही प्रश्नांवर चर्चा केली . त्यांच्या प्रश्नांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . दिपक एकबोटे यांनी अभ्यासपुर्ण व समाधानकारक उत्तरे दिली . बँकेचे चेअरमन श्री . अतुल काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वरिष्ठ अधिकारी श्री . विरेश पैठणकर यांनी बँकेचे मागील सभेचे इतिवृत्तांचे वाचन केले व श्री . चंद्रशेखर व्यास , वरिष्ठ अधिकारी यांनी आभार मानले .
