सर्व्हे नंबर २१५ च्या मिळकती नियमानुकूल करून ६५० कुटुंबांचा प्रश्न सोडवावा आ. आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना.अजित पवारांकडे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगांव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नंबर २१५ वरील मिळकती नियमानुकूल करून वास्तव्यास असणाऱ्या ६५० कुटुंबांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. २१५ मध्ये नागरिकांच्या मिळकती असून त्यामध्ये जवळपास ६५० कुटुंब वास्तव्य करीत आहे. या मिळकती नियमानुकूल व्हाव्यात अशी या कुटुंबांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून सर्व्हे नं. २१५ मधील सर्व मिळकती नियमानुकूल करणेसाठी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची कार्यकर्त्यांसमवेत भेट घेवून मागणी केली आहे.
या मागणीला उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, वाल्मिक लहिरे, सचिन गवारे, हाजीसलिम चमडीवाले, हाजीबाबुभाई सय्यद, हाजीरशीद शेख, युसुफभाई पठाण, आसिफ मणियार, मुनीर शेख आदी उपस्थित होते.

फोटो ओळ- सर्व्हे नंबर २१५ मधील उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करतांना आ.आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *