
कोपरगाव प्रतिनिधी:-
हरिद्वार येथे जीवन अमृत तर्फे नुकतेच झालेल्या तीन दिवसीय भव्य दिव्य अशा आयुर्वेद कुंभ परिसंवादात भारतातील 5000 वैद्यांनी एकाच वेळी 5000 चरक संहिताचे सामूहिक वाचन करून एक जागतिक रेकॉर्ड बनवले. भारतात प्रथमच एवढ्या संख्येने वैद्य एकत्र जमा होऊन हे रेकॉर्ड बनविले गेले. भारतातील नामांकित 8 वैद्यांचे व्याख्यानांचे नियोजनही यावेळी करण्यात आले होते. कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड यांचे “स्त्रीरोग व गर्भावस्थेतील पंचकर्माचे महत्व” या विषयावर व्याख्यान झाले. 5000 वैद्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वैद्य रामदास आव्हाड यांना सप्तऋषी चिकित्सक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर धुळे येथील वैद्य प्रवीण जोशी, जळगाव येथील वैद्य नरेंद्र गुजराथी, अहमदाबाद येथील वैद्य तपनकुमार, दीव येथील वैद्य दमनिया यांचाही हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. डॉ रामदास आव्हाड यांची कन्या डॉ.सौ .मयुरी आव्हाड वाघ हिचा सौंदर्य क्षेत्रातील नव उद्योगाबद्दल * युथ वैद्य आयकॉन पुरस्कार * देऊन गौरव करण्यात आला. भारतभरातील 5000 वैद्य व गुरुजनांसमोर डॉ मयूरी हिच्या कॉस्मोआयुर्वेद कॉनसेप्ट वर बनवलेल्या एलना या सौंदर्य प्रसादनाचे प्री-लौंचिंग करण्यात आले. माघील आठवड्यातच हिंद परिवार तर्फे जिंजीच्या किल्ल्यावर डॉ रामदास आव्हाड यांचा सह्याद्री जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.भारतात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आयुर्वेदातील वैद्यगण कुंभ साठी एकत्र आले होते ..
