कोपरगाव तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने शरद तांदळे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध:- शहराध्यक्ष ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
सोशल मीडियावर अत्यंत मोठया प्रमाणावर वारकरी संप्रदायाविषयी अपशब्द वापरणारे शरद तांदळे यांच्या वक्तव्याचा कोपरगाव शहर व तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील संत परंपरेने ,वारकरी संप्रदायाने अतिशय सोप्या भाषेत भक्तीची व्याख्या सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवली.ज्ञानोबा,तुकोबांपासुन निर्माण झालेल्या संत परंपरेने, वारकरी संप्रदायाने सर्व मानवजातीला समता,बंधुता व विश्वशांती चा संदेश दिला. वास्तविकपणे “यारे यारे लहान थोर,याती भलती नारी नर” या संत वचना प्रमाणे कोणत्याही जाती-धर्माचा,वयाचा,स्त्री-पुरुष याचा विचार न करता सर्वांना भक्ती सोप्या पद्धतीने मांडून केवळ महाराष्ट्र व देशच नव्हे तर संपूर्ण विश्वाला शांततेचा,एकत्मतेचा संदेश दिला. याच संत परंपरेविषयी,वारकरी परंपरेचे पाईक असलेल्या वारकरी भजनी,किर्तनकार, गायक,वादक यांच्याविषयी अनास्था मनात धरून सर्व सामान्य माणसामध्ये द्वेष पसरवण्याच्या एका वाईट हेतूने शरद तांदळे यांनी केलेलं वक्तव्य अतिशय घ्रुनास्पद आहे.यामुळे महाराष्ट्रात वारकरी संप्रदाया मध्ये खूपच संतापाची लाट आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे,”मऊ मेनाहुनि आम्ही विष्णूदास,कठीण वज्रास भेदू ऐसे! भले तरी देऊ कासेचि लंगोटी,नाठाळाचे माथी हाणू काठी!!” नाठाळ लोकांमध्ये सभ्यतेची,संस्कृतीची भाषा समजत नसेल तर त्यांच्या माथ्यावर काठी मारण्याचेही संतांनी सांगितले आहे.त्याचा अवलंब सुद्धा वेळोवेळी केला जाईल. या निमीत्ताने वारकरी सांप्रदाय शासनास विनंती करतो आहे की, शांततेच्या काळात असे समाज कंटक कोणाही विषयी मुर्खासारखे वक्तव्य करुन अखिल समाजात तेढ निर्माण करुन वातावरण दूषित करतात, अशा समाज कंटकाचा कायद्यातील तरतुदी नुसार वेळीच बंदोबस्त करावा.जेणे करून जमाजात शांतता कायम राहिल.
शरद तांदळे यांच्यावर कठोर कारवाई करून अटक करावी व वारकरी संप्रदायाची तथाकथीत बदनामी करणारे गैरप्रकार घडत असून अशा प्रवृत्तींना योग्य वेळी शिक्षा करावी,समाजामध्ये अशांतता पसरवणाऱ्या घटकांचा योग्य विचार करावा. व येथून पुढे कोणीही वारकरी संप्रदायाची बदनामी करू नये,अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शहर अध्यक्ष ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे,उपाध्यक्ष ह.भ.प.नंदू महाराज तांबट,सप्ताह व दिंडी समिती प्रमुख ह.भ.प.भिमराज महाराज जाधव,प्रसिद्धी प्रमुख कु.ऐश्वर्याताई बिडवे तसेच तालुका अध्यक्ष ह.भ.प.काशिनाथ महाराज मोरे, उपाध्यक्ष ह.भ.प पोपट महाराज जाधव
ह.भ.प.अशोक नाईक,ह.भ.प.संजय जाधव,ह.भ.प.रावसाहेब साळुंके,कु.पायल साळुंके
सर्व पदाधिकारी तसेच संपूर्ण वारकरी मंडळाने केली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आम्ही शांततेच्या व सहिष्णूतेच्या मार्गाने मागणी करत आहोत. व कारवाई न झाल्यास वारकरी मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे संपूर्ण वारकरी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *