

कोपरगाव प्रतिनिधी:-
“स्वच्छता ही सेवा” या अभियान अंतर्गत सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या १५० विद्यार्थींनी ९ ते ११ या वेळेत शालेय परिसरातील राममंदीर रोड ते लक्ष्मीनगर देवी मंदिर परिसर व रोड स्वच्छ करण्यात आला.
नऊ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागृकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी प्रचंड उत्साह दाखवला होता. परिणामी, स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले आणि “स्वच्छ भारत अभियान” हे नाव घराघरात पोचले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना कृती करण्याचे अनोखे आवाहन केले आहे. मन की बातच्या १०५ व्या भागात पंतप्रधानांनी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी १ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. या अभियानाला सेवा निकेतन शाळेच्या स्काऊट विभागाच्या १५० विद्यार्थींनी दोन तास अभियान कृतीतून उतरवून परिसराची स्वच्छता केली.
याप्रसंगी भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके हे उपस्थित होते.काही वेळ मुलांसमवेत स्वच्छता अभियान केले. या प्रसंगी श्री.घोडके म्हणाले, “स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. स्काऊटच्या माध्यमातून स्वयंंशिस्त आणि स्वच्छतेचे संस्कार पाहून समाधान वाटले.” असे सांगितले. तसेच शाळेच्या मॅनेजर सिस्टर मेरी, प्राचार्या सिस्टर शांती व सिस्टर बाबरा,शाळेचे स्काउट मास्टर ज्ञानदेव घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली गोकुळ आरणे, मंजूर शेख ,सौ. प्रतिभा गायकवाड, सौ. शितल गहिरे, शिवाजी जाधव यांनी विदयार्थ्या समवेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. संकलित कचरा नगरपालिकेच्या कचरा गाडीत टाकण्यात आला. या वेळी परिसरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
