
कोपरगाव प्रतिनिधी:- कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी शैक्षणिक संकुलातील बी. फार्मसीचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला.असून फार्मसी पहिल्या पदवीधर बी. फार्मसीचा चतुर्थ वर्षाचा निकाल ८५% लागला.प्रथम क्रमांक दिशा दुबे ८६.०९% (CGPA – ९.११), द्वितीय क्रमांक सई लाड ८५.५२% (CGPA-९.०५) तृतीय क्रमांक प्रतिभा वहाडणे ८४.२०% ( CGPA – ७.९१) यांनी पटकावला.यावेळी फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असणारी जी-पँट व नायपर- जेईई परिक्षेत आर जे एस फार्मसीच्या विदयार्थ्यांनी यश मिळवले. आर जे एस कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजी, विद्यापिठाशी संलग्न आहे. या महाविद्यालयात नियमित तासिका तज्ज्ञ शिक्षकांची व्याखान, सुसज्य ग्रंथालय व प्रयोगशाळा, औद्योगिक भेटी तसेच औद्योगिक व्यवसाय मार्गदर्शन यासोबत प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.
महाविद्यालयाने वेगवेगळ्या फार्मा कंपनीसोबत सामंजस्य करार केले. असून त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला मदत होऊन मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते. तसेच संशोधन आणि विकास कार्यक्रम, वेगवेगळ्या परिषदा व चर्चासत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते. उत्कृष्ट निकालाची परंपरा चतुर्थ वर्षाच्या विदयार्थ्यांनी सुरु केली आहे. परिक्षेला बसलेल्या तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह
प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याची किमया साकारली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव व एस जे एस हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक प्रसाद कातकडे, उद्योजक विजय कडू, विश्वस्त दिपक कोटमे तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.नितिन जैन, उषा जैन व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
फोटो ओळी
आर जे एस फार्मसी चतुर्थ वर्षात पहिल्या ३ आलेल्या विद्यार्थीनी
(१) दिशा दुबे :- CGPA - ९.११

(२) सई लाड:- CGPA-९.०५

(३) प्रतिभा वहाडणे :- CGPA - ७.९१

