रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचा खर्चही मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर रक्कम तात्काळ जमा करून शासनाने जिल्हयातील सर्व शेतक-यांना दिलासा दयावा:- विवेक कोल्हे….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतक-यांचे थकीत कर्ज देान लाखाच्या वरील आहे त्या शेतक-यांना अदयापही कर्जमुक्तीचा लाभ झालेला नाही. असे कोपरगाव तालुक्यात सुमारे 275 षेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे 16 हजार 577 षेतकरी असुन त्यांना महाविकास आघाडी शासनाने प्रत्येकी 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली असुन ही रक्कम तात्काळ शेतक-यांच्या खाती जमा करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विवेकभैया कोल्हे यांनी केली.
अहमदनगर जिल्हा बॅकेअंतर्गत तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी 275 असुन त्यांना सुमारे 7 कोटी 61 लाख 96 हजार रूपये तर नियमीत कर्ज परतफेड करणारे 16 हजार 577 शेतकरी असुन त्यांना 108 कोटी 56 लाख रूपये मिळणार आहेत त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे. मागील हंगामात शेतक-यांना अतिवृष्टी
चा फटका बसला त्यामुळे त्यांच्या हातुन खरीपाचे पीक वाया गेले तर रब्बी हंगामाची पीके उभी करतांना त्यांना पैशाची जमवाजमव करतांना
कष्ट पडले, त्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. रब्बी पीक काढणीला आले आहे त्याचा खर्चही मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम तात्काळ जमा करून शासनाने जिल्हयातील सर्व शेतक-यांना दिलासा दयावा, असेही श्री कोल्हे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *