
कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चित्रकार रवींद्र कांबळे यांनी आपल्या कला दृष्टीने आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधील कंपनीत दोन वर्षापासून काम करीत असलेला चिरंजीव परक रवींद्र कांबळे यास एक नवीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सॉफ्टवेअर कंपनीला चांगली नोकरी सोडुन प्रिंटिंग क्षेत्रात पदार्पण केले अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील फोर कलर प्रिंटिंग ची सर्वप्रथम कोमोरी 426 जापान आद्यावत मशीन आयात करून डीजी प्रिंट मीडिया या नावाने आजूबाजूच्या तालुक्यांना देखील नाशिक पुणे अशा ठिकाणी मिळणारी गुणवत्तापूर्ण अशी प्रिंटिंग सुविधा कोपरगाव सारख्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे यानिमित्ताने ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे प्रिंटिंग क्षेत्रात आपल्या तांत्रिक दृष्टिकोनाचा वापर करीत साधारणतः सात आठ महिने अभ्यासपूर्ण करून त्याची डीजीप्रिंट मीडिया या फर्म ची माननीय नामदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते शुभारंभ करून व वडील चित्रकार रवींद्र कांबळे व आई प्रतिभा रवींद्र कांबळे विशेष शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली ओम नगर निवारा या ठिकाणी 5000 स्क्वेअर फिट जागेत आधुनिक अशी प्रिंटिंग इंडस्ट्री सुरू केली भविष्यात आणि गुणवत्ता पूर्ण उपक्रम हाती घेणार असून ग्रामीण भागातील लोकांना यापुढे फोर कलर प्रिंटिंग च्या सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती ही होणार आहे नाशिक पुणे सारख्या शहरांकडे न जाता कोपरगाव सारख्या ठिकाणी गुणवत्तेची प्रिंटिंग सुविधा आपणास उपलब्ध करीत असून त्याचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहोत त्याच्या या कामाची दखल न्यूज नेशन चॅनल न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने घेऊन अहमदनगर संकल्प या कार्यक्रमात युवा उद्योजक म्हणून चिरंजीव परक रवींद्र कांबळे यास राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री माननीय प्राजक्त तनपुरे साहेब तसेच नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील पंचतारांकित हॉटेल सेंट लुर्न या ठिकाणी शानदार सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले
