

कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज शिर्डी सिन्नर चौपदरी रस्ता व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या सिन्नर इगतपुरी परिसरातील कामाची पाहणी केली.
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. बी.गायकवाड, अधीक्षक अभियंता आर.पी.निघोट, कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, कार्यकारी अभियंता डी.के.देसाई,अभियंता एन.के.बोरसे, पी.व्ही.सोयगावकर, एन.एच.ए.आयचे प्रकल्प संचालक बी.एस.साळुंके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे,
यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


