ग्रामीण भागातील महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे कौतुकास्पद:-
संगीता मालकर ; वारीत महिलादिनानिमित्त तीन दिवसीय मसाले प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- अलीकडे शहरी भागात सर्वचप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे राहणाऱ्या महिलांना नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. याच माध्यमातून विविध प्रशिक्षण घेऊन पुढे चालून त्यातून रोजगार निर्मिती देखील होते. याउलट ग्रामीण भागातील महिलामध्ये देखील खूप काही करण्याचे सामर्थ्य असते. परंतु, तसे व्यासपीठ त्यांना उपलब्ध होत नाही. मात्र, गावातील महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संधी उपलब्ध करून देण्यासाठी टेके पाटील ट्रस्ट प्रयत्नशील आहे. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी म्हटले.
कोपरगाव तालुक्यातील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत वारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व ग्रामपंचायत सदस्य राहुलदादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ वारी परीसरातील महिला भगिनींसाठी ५ ते ७ मार्च दरम्यान दुपारी १२ ते ४ या वेळेत तीन दिवसीय मोफत चविष्ट व रुचकर मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याची सांगता मंगळवारी (दि.७) करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर व राहुल दादा टेके पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या शिबिरात श्रीरामपूर येथील तज्ञ महिला प्रशिक्षक विद्याताई क्षीरसागर यांनी ५० पेक्षाजास्त महिलांना जवळपास ३० पेक्षा जास्त मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण देवून प्रात्यक्षिकही करून घेतले. तसेच महिलांना व्यावसायिक मार्गदर्शनही केले. वारी ग्रामपंचायतचे प्रशासक तथा कोपरगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित प्रशिक्षणार्थी महिला योगिता पवार यांनी कविता सादर केली. तर काही महिलांनी शिबिरांचा आम्हाला निश्चितच फायदा होणार असून आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले. शिबिराच्या शेवटी महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासक बाळासाहेब साबळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, कृषीतज्ञ अरविंद मालकर, सरपंच सतीशराव कानडे, प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्र ललवाणी, राधाराणी कलेक्शनचे संचालक चंद्रकांत पाटील, मधुकर सोनवणे, अशोक निळे, सतीश गायकवाड, अनिरुद्ध जाधव, साईराज टेके, अनिरुद्ध टेके, राधा टेके, रामकृष्ण टेके यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार रोहित टेके यांनी मानले.

फोटोओळी:-
वारी येथे महिला दिनानिमित्त तीन दिवसीय मसाले बनविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *