आर जे एस फाऊंडेशन मध्ये जागतिक महिला दीन साजरा, महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी मोफत होणार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनमध्ये ८ मार्च रोजी जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करुन झाली.


यावेळी होमिपॅथी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते,आई वरील तयार केलेल्या कविता, नाटिका सादर केल्या प्रमुख महिला पाहुण्यांनी केक कापून आर जे एस फाऊंडेशन मधील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या मागील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी आर जे एस फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांच्या पत्नीच्या वाढदिवानिमित्त
फाउंडेशनचे चेअरमन चांगदेव कातकडे, एस जे एस हॉस्पिटलचे संचालक प्रसाद कातकडे यांच्या सूचनेनुसार
होमिओपॅथी कॉलेज मार्फत फाऊंडेशन मधील सर्व स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.म्हणून सर्व महिला कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी दर महिन्याच्या ७ तारखेला केली जाणार अशी घोषणा करण्यात आली होती. ७ फेब्रुवारी रोजी महिला दिनानिमित्त त्यांच्या आरोग्याची तपासणी करून शरीरातील घटक वाढण्यासाठी मल्टी व्हिटॅमिन कॅल्शियमचे मेडिसिन पॅकेटचे वाटण्यात करण्यात आले.
याचे वाटप प्रमुख महिला पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


यात महत्वाची बाब म्हणजे ८० टक्के महिला फाऊंडेशन मध्ये कर्मचारी आहे.महिला दिनाच्या दिवशी होमिपॅथी व एस जे एस रुग्णालयातील सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम पार पडण्यासाठी होमिपॅथी कॉलेजमधील मुलांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्राचार्य सावणी यरनाळकर यांनी केले. सूत्रसंचालन सिमरन पटेल,प्रणाली महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन भक्ती आहेर हिने केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने केली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात बीजनेस हूमन दीपा ठोळे,गृहिणी प्रतिनिधि शारदा कार्ले, बेबिताई कातकडे,पूजा कातकडे,फार्मसी कॉलेजच्या उषा जैन, होमिपॅथीच्या प्राचार्या डॉ.सावणी यरणाळकर ,दैनिक अजिंक्य भारतचे पत्रकार अमोल गायकवाड व इतर सर्व शिक्षकवृंद कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *