बाल वयातील संस्कार आणि थोर व्यक्तिंचे आदर्श महत्वाचे:- श्री बिपिनदादा कोल्हे…

Uncategorized

संजीवनी अकॅडमीचे वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न, ‘उद्योजक’ संकल्पनेची विद्यार्थ्यांमध्ये रूजवण…
कोपरगांव प्रतिनिधी:- बालवयातच चांगल्या गुणांची रूजवण होते. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयात स्वराज्याचे धडे दिले म्हणुन हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहुन संपुर्ण जगाला ज्ञानामृत पाजले. संत मुक्ताबाईंनी बालवयात केलेल्या अभंगाच्या रचना आजही भावतात. म्हणुन बालवयातील संस्काराला अनन्य साधारण महत्व आहे. संजीवनी अकॅडमीने या समारंभाच्या दर्शनी भागात उद्योजक श्री नारायण मुर्ती, श्री रतन टाटा व स्व. शंकररावजी कोल्हे यांची उभारलेली तैलचित्रे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा थोर व्यक्तींचे आदर्श सुध्दा नविन पिढीने डोळ्यासमोर ठेवुन आपला जीवन प्रवास करावा, असे प्रतिपादीन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्ह यांनी केले.
संजीवनी अकॅडमी मध्ये ‘उद्योजकता’ या संकल्पनेवर आधारीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसम्मेलनाच्या माध्यमातुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री कोल्हे बोलत होते. दोन दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमांदरम्यान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, उद्योजक श्री कौशिक मुजुमदार, उद्योजीका सौ. मनीषा धात्रक व संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी उपस्थिती देवुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दोनही दिवशी पालकांची आणि विध्यार्थ्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती उल्लेखनिय होती.
कोणत्याही षाळेचे वार्षिक स्नेहसम्मेलन म्हटले की सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. परंतु विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी देत काळाच्या ओघात भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये काय अधिकची निपुणता हवी, या बाबीची दखल घेत संजीवनी अकॅडमी मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवाणी बरोबरच उद्योजक ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्यासाठी उद्योजकता आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यवहार चातुर्याचे दर्शन घडविले.
सदर प्रसंगी श्री बिपिनदादा पुढे म्हणाले की स्व. शंकररावजी कोल्हे यांनी ७२ वर्षांपूर्वी स्वीत्झरलंड मध्ये घड्याळाचा कारखाना उभारण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या आजोबांनी त्यांना परत बोलविले आणि येथील जनतेसाठी काहीतरी करण्याचा सल्ला दिला. या प्रेरणेतुन त्यांनी सहकारातुन उद्योग फुलविले तसेच संपुर्ण आयुष्य शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी आयुष्य घालविले. शिक्षण हा त्यांचा महत्वाचा विषय होता. म्हणुनच येथे एकाच छताखाली के.जी. ते पीएच. डी. पर्यंतच्या विविध विद्या शाखांमधील शिक्षण देवु केले. भविष्यातील बहुआयामी नागरीक घडविण्याच्या दृष्टीने संजीवनी अकॅडमीचे पावले योग्य दिशेने पडत आहे, हे सध्या येथिल १५०० इतक्या पटसंख्येने सिध्द होत आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधुन शिक्षण घेवुन सुमारे ५००० माजी विध्यार्थी विध्यार्थी प्रगत देशांमध्ये कार्यरत आहे, येथिल विध्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादित पहिल्या दहा क्रमांकात येवुन गोल्ड मेडल मिळवितात, ही संजीवनीची खरी उपलब्धी आहे. ज्या विध्यार्थ्यांच्या घरी काहीच आर्थिक सुबत्ता नव्हती, असे विध्यार्थी यशो शिखरावर गेली आहेत. येथे जमलेल्या पालकांनी सुध्दा आपली पाल्ये साता समुद्रापार गेली पाहीजे, हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवुन त्यांच्या पंखाना बळकटी दिली पाहीजे.
उद्योजक कौशिक मुजुमदार व उद्योजिका सौ मनिशा धात्रक यांनी स्नेहसम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी विध्यार्थ्यानी उद्योजकता संकल्पनेतुन उभारलेल्या स्टाॅल्सला भेटी देवुन विध्यार्थ्यांच्या मार्केटींग स्कीलचे कौतुक केले.
संचालिका डाॅ. कोल्हे म्हणाल्या की अभ्यासाबरोबरच विध्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान देणे आवश्यक आहे. आजच्या उद्योजकता आनंदोत्सव मेळाव्यातुन भविष्यात दहा टक्के जरी विध्यार्थी उद्योजक झाले तर आमचा हेतु सफल झाला, असे आम्ही मानु. यावेळी त्यांनी पालकांना आवाहन केले की आपले पाल्य भविष्यात एखादा उद्योग काढून इतरांना रोजगार देत असतील तर त्यांच्या पाठीशी उभे रहा.
प्राचार्या शैला झुंजारराव यांनी स्कूलच्या प्रगतीचा आलेख मांडला. या आनंदोत्सवात इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, गेम्स, भाजीपाला, आर्टस् अँड क्राफ्टस्, इत्यादींचे स्टाॅल्स उभारले होते. पालक व नातेवाईकांलनी स्टाॅल्सवर जावुन मनमुराद आनंद लुटला. संजीवनी एमबीएचे विध्यार्थी व प्राद्यापकांनी विध्यार्थ्यांना दोन दिवस अगोदर मार्केटींगचे धडे दिले.
भव्य रंगमंच, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था, आकर्षक विद्युत रोषणाई , भव्य बैठक व्यवस्था आणि बाल कलांकारांनी सादर केलेल्या कलेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद तसेच संजीवनी अकॅडमीच्या शिक्षकांकडून प्रत्येक पालकाचे व येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत हे या आनंदोत्सवाची वैशिष्ट्ये होती.

फोटो ओळीः १. संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उद्योजकता संकल्पनेवर उभारलेल्या स्टाॅलला भेट देताना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे.

२. संजीवनी अकॅडमीच्या स्नेहसम्मेलनात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे यांचे स्वागत करताना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे स्वागत करताना.यावेळा मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, संचालिका डाॅ. मनाली कोल्हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *