प्रहार देवळाली प्रवरा शहर उपअध्यक्ष पदी अशोक देशमुख यांची निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर उपअध्यक्ष पदी देवळाली प्रवरा येथील अशोक बाबासाहेब देशमुख यांची एक मताने निवड करण्यात आली.
देवळाली प्रवरा येथील प्रहार कार्यालयात प्रहार चे शहर अध्यक्ष किरण पंडीत यांचे हस्ते देशमुख यांना निवडीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रहारचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित, प्रहार दीव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष सलीम शेख आदी या प्रसंगी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *