नागरिकांचे प्राण वाचवेत हाच आमच्या आंदोलनाचा उद्देश:- जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे…

Uncategorized

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने जबाबदारीने काम करावे :- अभिजीत पोटे…
प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक साखर सह उपसंचालकाना धरले धारेवर…
प्रादेशिक परिवहनच्या विनंतीवरून प्रहारचे ढोल बजाव आंदोलन स्थगित करून बैठक…
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्ह्यातील धोकादायक ऊस वाहतुकी बाबत अहमदनगर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रहार जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे वाहतूक विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रादेशिक साखर सह उपसंचालक लोखंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक वाघ यांची बैठक दि २१ डिसेंबर रोजी बैठक पार पडली
अहमदनगर जिल्ह्यातील धोकादायक ऊस वाहतुकीबाबत दिनांक १४ डिसेंबर रोजी प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालयात ढोल बजाव आंदोलनाचा इशारा दिला होता प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदाराचे वाहतूक विभागाचे प्रमुख, वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्यासह २१ डिसेंबरला आंदोलन न करता आपण चर्चेतून मार्ग काढू असे विनंती पत्र दिल्यानंतर जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी आंदोलन स्थगित करून अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बैठकीला पदाधिकाऱ्यांसह उपस्थिती लावली या बैठकीत ५० टक्के कारखानदाराचे वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रथम प्रहार ने धोकादायक उस वाहतुकी बाबत आवाज उठवला म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रहारच्या भूमिकेचे स्वागत केले अभिजीत पोटे यांनी सर्व कारखान्यांचे वाहतूक विभागाचे प्रमुख आणि प्रादेशिक सह उपसंचालक लोखंडे यांना तुम्ही संबंधित कारखान्यांना बैठकीची माहिती देऊन सुद्धा अर्ध्यापेक्षा कमी कारखाने बैठकीला उपस्थित झाले असल्याने यातून स्पष्ट दिसून येते प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे या कारखानदारावर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पत्रकार तसेच प्रसिद्धी माध्यमांना का कळवले नाही असा सवाल केला असता उपस्थित सर्व अधिकारी निरुत्तर झाले साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी प्रादेशिक साखर कार्यालयाने प्रादेशिक परिवहनचा अधिकाऱ्यांच्या मदतीने कारखानदारांच्या वाहतूक विभागाला रस्ता सुरक्षा बाबत अवगत करणे गरजेचे असताना औपचारिक बैठका घेऊन आपली जबाबदारी झटकून टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप केला प्रहार जनशक्ती पक्षाचे नाते सामान्य माणसाच्या दुःखाशी आणि वेदनेशी आहे रस्ता अपघातामध्ये आत्तापर्यंत हजारो लोकांना अपंगत्व आले शेकडो लोकांचे प्राण गेले कुटुंबातला करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाचे छत्र हरवले प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आरटीओ इन्स्पेक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची जास्त पदे रिक्त असल्याची प्रहार जनशक्ती पक्षाला जाणीव आहे पण ही जबाबदारी कुणा एका विभागाची नसून संबंधित कारखान्यांची देखील आहे साखर कारखानदार फक्त ऊस वाहतूकदार कारखान्याला दररोज गाडीची खेप टाकतो की नाही गाडी जास्त भरून आणतो की नाही फक्त यावरच लक्ष देतात नागरिकांच्या जीवाचे त्यांना काही देणे घेणे नाही वाहन चालक यांना कुठलीही व्यवस्था कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध नाही फक्त अर्थकारण महत्त्वाचे आहे अपघाताला कुठलाही चेहरा नसतो यामध्ये कारखान्याचा चेअरमन अथवा आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता सुद्धा या अपघाताचा केव्हाही बळी ठरू शकतो ही बाब सर्व साखर कारखान्यांच्या वाहतूक विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित साखर कारखान्यांना सात दिवसाचा अल्टीमेटम देऊन परिपत्रक काढावे व कारखान्यात आलेल्या ट्रक, ट्रॅक्टर, जुगाड यांसारख्या वाहनांची कागदपत्रे तपासावीत वाहनांना समोरून आणि पाठीमागून रिफ्लेक्टर लावले असल्याची खात्री करावी अल्पवयीन वाहन चालकांना रोखण्यासाठी वाहन परवाने तपासावेत ऊसतोड हार्वेस्टर ने तोडलेला ऊस वाहनातून आणताना तो झाकून आणावा त्यासाठी लागणारी जाळी ताडपत्री साखर कारखान्यांनी वाहन धारकांना उपलब्ध करून द्यावी सुरक्षिततेचे नियम न पाळणाऱ्या वाहनाचा ऊस साखर कारखानदारांनी खाली करून घेऊ नये हे सर्व नियम वाहन चालक आणि वाहन मालकांना समजण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर गट यार्ड व कारखान्याच्या गेट समोर वाहन सुरक्षिततेचे नियम दर्शवणारे मोठे बोर्ड उभारावेत तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस वाहतूक निरीक्षक यांनी या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मध्ये असणारे म्युझिक सिस्टम तातडीने जप्त करावेत अहमदनगर जिल्ह्यात कागदावरती फक्त वर्षभरात दोन ते तीन ड्रंक अँड ड्राईव्हचा केसेस नोंदवल्या जातात अशा मद्यपी वाहन चालकांपासून होणारे अपघात टाळण्यासाठी असे यंत्र मोठ्या प्रमाणात शासनाकडून उपलब्ध करावेत वाहनांची कागदपत्रे तसेच अल्पवयीन ड्रायव्हरला रोखण्यासाठी वाहन परवाना तपासणी मोहीम जागोजागी राबवावी ट्रॅक्टर, ट्रक, जुगाड यांसारखी वाहने रस्त्यावरून जाताना रोडवर असणाऱ्या हॉटेल समोरच रस्त्यावर वाहने सोडून एका मागे एक वाहने रस्त्यावर उभी करून रांग लावतात त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनास जागा न मिळाल्याने अपघात होतात प्रहार चे चालक-मालक वाहतूक संघटनेचे प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे यांनी या वाहन चालकांना कारखाना स्थळावर कुठेही स्वच्छतागृह किंवा आराम करण्यास कुठलाही निवारा उपलब्ध नसल्याने या वाहनचालकांना आराम न मिळाल्याने यांची झोप न झाल्याने अपघात होत असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने साखर कारखान्यांना काढणाऱ्या परिपत्रकात हा मुद्दा घेण्यास सुचवला आहे किमान सात दिवस सर्व कारखान्यांकडून वाहन चालक आणि मालक यांना नियमावली समजेपर्यंत कुठलीही कारवाई करू नये असे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी बैठकीत आपले मत मांडले मात्र आठ दिवसानंतर वाहन चालक सुरक्षिततेचे नियम न पाळणारी वाहने रस्त्यांवर दिसली आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन जिल्हाभर छेडणार असल्याचे चालू असलेल्या बैठकीतच पोटे यांनी जाहीर केले यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना तातडीने परिपत्रक काढून सात दिवसानंतर होणाऱ्या कारवाईची कल्पना देण्यासाठी परिपत्रक काढत असल्याचे जाहीर केले या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस, प्रहार चालक-मालक वाहतूक संघटनेचे प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, श्रीरामपूर युवक तालुका अध्यक्ष रघुनाथ शिंदे, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, उपाध्यक्ष भैरवनाथ कांगुणे, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे बैठकीला उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *