
कोपरगाव प्रतिनिधी:-
डॉ बाबासाहेब यांनी सर्व सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन सर्व समावेशक विचार मांडले मात्र आजून देखील या महामानवाच्या विचारांची उंची समजली नाही हे दुर्दैव असल्याची खंत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिवर्तन दिना निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील स्मारकाला अभिवादन केले



डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व सामान्य माणूस केंद्री भूत ठेऊन सामाजिक,राजकीय ,आर्थिक विचार मांडले तसेच शेती पाणी,धरणे,वीज निर्मिती या विषयावर देखील काम केले हजारो वर्षे अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क व अधिकार प्राप्त करून दिले चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून सुरू झालेला हा प्रवास मंदिर प्रवेश ते धर्मांतर एवढा मर्यादित नसून सर्व सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवून केलेला खूप अथांग प्रवास असून देशाच्या आजच्या सामाजिक,राजकीय ,आर्थिक परिस्थितीत देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खूप पुढे नेऊ शकतात.आजही अनेक जात समूह सामाजिक न्यायापासून वंचित आहेत. व्यवस्थेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाती पुरते मर्यादित केले असून डॉ आंबेडकर यांच्या आकाशाला गवसणी घेणाऱ्या विचारांची उंची देशवासीयांना समजली नाही याची खंत वाटते
सुरेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे १९५८ साली कोपरगाव तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात पहिले स्मारक असून या स्मारकाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी अँड.नितीन पोळ यांनी केली
