जनजागर सरपंच असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी किशोर गाडे यांची नियुक्ती…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील चासनळी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर रावसाहेब गाडे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच व सदस्य असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विकास गरड व मार्गदर्शक कैलास गोरे यांनी त्यांना हे नियुक्तीपत्र दिले आहे.
श्री. किशोर रावसाहेब गाडे हे चासनळी येथील रहिवासी असुन त्यांचा अहमदनगर जिल्हयातील विविध सामाजिक कार्यात सहभाग असतो. या निवडीबददल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. अहमदनगर जिल्हयातील ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच व सदस्यांना उदभवणा-या अडचणींची सोडवणुक या माध्यमांतून करण्यांत येणार आहे.
नाशिकच्या कृषीसेवक बळीराजा आत्मसन्मान सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप दिघावकर यांनीही त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून तसे पत्र दिले आहे. या दोन्ही संघटनेच्या माध्यमांतुन सामाजिक कार्यात राहुन अहमदनगर जिल्हयाच्या विकासात भर घालु असे ते म्हणाले. त्यांच्या निवडीबददल सर्वच थरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *