
कोपरगाव प्रतिनिधी:-
सुसंस्कृत महाराष्ट्र अशी देशात वेगळी ओळख असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची राजकारणाची देखील संस्कृती आहे. लोकशाही म्हटले की, टीका टिप्पणी आलीच तो राजकारणाचा एक भाग आहे. मात्र टीका टिप्पणी करतांना मर्यादा पाळणे गरजेचे आहे.मात्र दुर्दैवाने संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय खालच्या थराची वापरली गेलेली भाषा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही ती या पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अशा प्रकारचे वक्तव्य हे निंदनीय व निषेधार्ह आहे त्यामुळे या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.- आ. आशुतोष काळे.
