के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त व हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित “महिलाओ के जीवन मे व्यक्ति स्वतंत्रता का महत्व” या विषयावरील विचार लेखन स्पर्धेत के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. कवडे धनश्री विक्रम अकरावी विज्ञान या वर्गातील विद्यार्थिनीस पारितोषिक प्राप्त झाले आहे. तीने मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अशोकराव रोहमारे, संस्थेचे सचिव अँड. संजीवदादा कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य श्री. सोनवणे बी. आर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. तसेच तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *