राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी जनार्दन जगताप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार जनार्दन साहेबराव जगताप यांची नुकतीच सर्वानुमते निवड झाली असल्याचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी देत जाहीर केले आहे.
जनार्दन जगताप (सर) हे गेल्या ३० वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पाहचूवुन न्याय देण्याचे काम करत पत्रकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे.तसेच पत्रकार बांधवांच्या हितासाठी संघटने मार्फत त्यांचा सुख सुखासाठी वेळोवेळी लढा दिला आहे.याच त्यांचा कार्याची दखल घेत राज्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी जगताप यांची तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे.
त्यांचा निवडीबद्दल तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसह हितचिंतक तसेच राजकिय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *