
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे प्रहार सा. बा. कार्यालयातील सदबुद्धी सत्यनारायण जागरण गोंधळ आंदोलन तूर्तास स्थगित…
चौकट –
[प्रहार ही सामाजिक कार्यात आग्रह धरणारी जिल्ह्यातील एकमेव संघटना आहे त्यांच्या निवेदनाचा विचार होत नसेल तर ते चुकीचे आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले…]
कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर):-
प्रहार ने सुचविलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आदेश दिले या बैठकीत प्रहारच्या मागणीची दखल न घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना डॉ. राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी यांनी फैलावर घेतले.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांचे सकारात्मक निर्णयामुळे प्रहार चे सा. बा. समोरील सदबुद्धी सत्यनारायण जागरण गोंधळ तूर्तास स्थगित केले असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यावर होणारे अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने वारंवार विनंती अर्ज करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयाच्या समोर सद्बुद्धी सत्यनारायण व जागरण गोंधळ कार्यक्रम घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी निवेदन दिले होते.
त्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची आज बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे प्रश्न उपस्थित केले त्यांचे सोबत बैठकीस प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार किसान आर्मीचे प्रमुख रघुनाथ आरगडे, रमेश भालके, नानासाहेब तागड, पाथरवाल्याचे सरपंच दत्तात्रय खाटीक आदी प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी प्रहारच्या निवेदनावर तात्काळ दखल न घेतल्याबद्दल ताशेरे ओढले तसेच प्रहार ही सामाजिक कार्यात आग्रह धरणारी जिल्ह्यातील एकमेव व अग्रगण्य संघटना असून त्यांच्या निवेदनाचा विचार होत नसले तर ते चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी साहेब म्हणाले की जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी नगर मनमाड रस्त्याचे टेंडर निघाले असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे त्याबद्दल काल मंत्रालयात बैठक संपन्न झाली असून एक महिन्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे तसेच पाथर्डी चा प्रस्तावही एक महिन्यात मार्गी लागेल प्रहारच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन रोड सेफ्टी चे सर्व नियम पाळण्यास सांगितले तसेच गॅस पाईपलाईन कामाची चौकशी करून ते नियमात कामे होतात किंवा कसे हे पाहण्याचेही जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश दिले त्याचबरोबर रस्त्याचे डिव्हायडर फोडल्याबद्दल संबंधितांवर तात्काळ कारवाई करून त्या डिव्हायडरची दुरुस्ती करण्याचे आदेशही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी दिले असता जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजगुरू यांनी ही बाब आमच्या कक्षेत येत नसल्याचे सांगितले असता जिल्हाधिकाऱ्यांनी जे डाबी चालक पेट्रोल पंप चालक किंवा इतर उद्योजक कुठलीही परवानगी न घेता अवैधरीत्या डिव्हाइडर फोडतील तर त्यांच्या समोरील रस्ता खोदण्याचे आदेश राजगुरू यांना दिले
या बैठकीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा ते टाकळीमिया या रस्त्याचे काम संदर्भात मुद्दा उपस्थित करून निवेदन दिले असता त्यावर जिल्हाधिकारी साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास प्रहारच्या मागणीतील सर्व रस्त्यांच्या बाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाध्यक्षांनी राहता श्रीरामपूर तालुक्यातील सीमेवरील वाकडी फाटा ते गणेश नगर एकरुखे हा रस्ता जिल्हा परिषदे कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाला सतत पाठपुरावा करून मंत्रालयातील रस्ते सचिवांकडे पाठवला असून दोन वर्ष होऊनही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला जात नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांच्या लक्षात आणून दिली नेवासा तालुक्यातील एकूण पंधरा रस्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून अवधी होऊन गेला मात्र नवीन रस्ते किंवा झालेल्या रस्त्यांना तीन-चार महिन्यातच खड्डे पडले असता त्या रस्त्यावर वृक्षारोपण केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खडबडून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असल्याची बाब सुरक्षा बैठकीत समोर मांडली नेवासा तालुक्यातील रस्ते व राहता तालुक्यातील वाकडी रस्ता कुलकर्णी यांनी रस्ता तातडीने वर्ग करून घेत असल्याचे सांगितले
बाभळेश्वर श्रीरामपूर नेवासा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित श्रीरामपूरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन गुजरे यांना रस्त्याच्या चालू असलेल्या निकृष्ट कामाबाबत विचारणा करून रस्त्याच्या निविदेची मागणी केली असता त्यांनी कुठलीही माहिती न देता मी आमदाराचा नातेवाईक असल्याची बतावणी करत असल्याची बाब श्री नवाज शेख प्रहार चे जिल्हा कार्याध्यक्ष व प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता जिल्हाधिकारी महोदय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता कुलकर्णी यांना यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांला समज देण्याची बतावणी केली.
