
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवा दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून योग शिक्षिका विमलताई पुंडे या उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना त्या म्हणाल्या की योगामुळे शरीर स्वस्थ व चांगले राहते. शरीरासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. शरीराची योग्य वाढ व विकास होण्यासाठी जीवनात अतिशय महत्त्वाचा मार्ग म्हणजे योग. शिक्षण घेत असताना आपल्या कला कौशल्यांकडे आपण लक्ष देणे गरजेचे असते. “इंसान शरीर से विकलांग हो तो कोई फरक नही पर वो मनसे विकलांग नही होना चाहिये”, म्हणूनच योग हे माणसाच्या मनाला ताकदवान बनवते योग हे एक अध्यात्मिक साधना आहे असं प्रतिपादन सौ विमलताई पुंडे यांनी केले.
या कार्यक्रमा वेळी सौ राजश्रीताई जाधव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला,
या वेळी त्या म्हणाल्या “लहान वयात आपले माता पिता आपल्यासाठी काय करतात हे आपल्याला जरी कळत नसले तरी मोठे झाल्यानंतर स्वतः पालक झाल्यावर समजते की आई-वडील मुलांसाठी परमेश्वरा समान असतात, आई-वडिलांच्या कष्टाला योग्य न्याय देण्याचे कार्य आपण करावे व आयुष्यात उत्तुंग प्रगती साधावी असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
महाविद्यालयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे संस्कारक्षम वागणे महाविद्यालयाचा सुंदर परिसर हे सर्व खूप आनंददायक व शिक्षणास पूरक आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायला हवा असे गौरवोद्गार सौ जाधव ताई यांनी काढले. तसेच सौ मंदाकिनी बारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बारे एन. जी. सर म्हणाले की विद्यार्थ्यांचे शरीर व मन संतुलित ठेवण्यासाठी योग हा महत्त्वाचा सेतू म्हणून कार्य करतो म्हणून विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व जाणून आपले शरीर निरोगी बनवावे.
आपण आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करत असतो आज योगा प्रशिक्षक सौ पुंडे ताई यांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले, त्याचा फायदा आमचे विद्यार्थी नक्कीच करून घेतील याची मला खात्री आहे.
जीवनात धन, संपत्ती,पैसा हा महत्त्वाचा नसून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले शरीर असते. म्हणून आपले शरीर योगाच्या माध्यमातून सुदृढ करा असा संदेश यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ विमलताई पुंडे (योग शिक्षिका), सौ राजश्रीताई जाधव.
सौ मंदाकिनी बारे, सौ सीमा गाडे, सौ निशा गाडे. या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बारे सर होते तसेच श्री ढेकळे सर, श्री रणधीर सर, कहार सर, वैराळ सर, गुजर मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार एस. बी. व सौ जाधव एस. आर. यांनी केले तसेच श्री पवार जी. के .यांनी आभार प्रदर्शन केले.
