
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना काळापासून शहरातील गोदावरी नदी तीरा नजीक दत्त पारा जवळ असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात गोरक्षनाथ मित्र मंडळाच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरापासून गोरगरीब दीनदलित दुबळ्या नागरिकांना दररोज अन्नदानाचे काम सुरू आहे अशी माहिती अध्यक्ष अध्यक्ष सुखविंदर सिंग शेखो, योगेश निकुंभ, मयूर वाणी, अक्षय खंडागळे, बिट्टू शेठ ठकराल,पप्पु ईंगळे, नवनाथ जाधव, धनवटे दाजी, अभिषेक मंडलीक, पिंटु शेठ नरोडे व मित्र मंडळ यांनी ही माहिती दिली गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेने दररोज गरजू व भिक्षेकरी यांना दररोज पातळ भाजी मसाले भात पोळी तसेच गुरुवारी गोड पदार्थ जेवणात दिले जातात 30 ते 35 जण याचा दररोज वर्षभरापासून लाभ घेत आहेत येत्या दिनांक 13 शनिवारी रोजी धर्मनाथ बीजे निमित्त धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन केले असून कार्यक्रम उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे

भाविकांसाठी दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद भंडारा महाआरती व इतर धार्मिक तज्ञ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
